ब्रेकिंग न्युज
घुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडित

त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय च्या वतीने मतदान जनजागृती अभियान

त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय च्या वतीने मतदान जनजागृती अभियान

 

शेवगाव:- तालुक्यातील ढोरजळगाव ने येथील त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संकुलाच्या वतीने मतदानाची जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने सर्व काम सोडून आपण मतदान करूया असे महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने कॉलेज पासून गावामध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या बस मध्ये बसून गावामध्ये रॅली काढण्यात आली. त्या रॅलीमध्ये सर्व शिक्षक वृंद व महाविद्यालयाचा इतर कर्मचारी वर्ग आणि महाविद्याते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बस मध्ये बसून गावामध्ये रॅली काढण्यात आली. त्या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे व शाळेचे सर्व शिक्षक वृंद शिक्षिका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपण सर्व काम सोडून मतदान केले पाहिजे व आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावा असे महाविद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सुचित करण्यात आले आहे. तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी पशु पक्षांना चारा कसा खाऊ घालावा यासाठी महाविद्यालयाच्या समोर बरणीमध्ये धान्य टाकून ते सर्व झाडांना बांधून ठेवण्यात आले आहे. व महाविद्यालयाच्या वतीने पक्षांना चारा आणि पाण्याचे नियोजन करून सर्व पक्षांना चारा आणि पाणी उपलब्ध महाविद्यालयाच्या समोर झाडांना करण्यात आले आहे. महाविद्यालयामध्ये पशुपक्ष्यांना कशाप्रकारे धान्य उपलब्ध करून त्यांना सगळ्या सोयी सोयीनुसार प्रत्येक झाडांना त्यांनी बरणीचे झाडांना बांधून धान्याचे आणि पाण्याचे नियोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे यामध्ये सर्व शिक्षक वृंद शिक्षिका इतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोलाचे कार्य केले आहे. तसेच मतदानाविषयी जनजागृती करून सर्वांनी आपलं कोणतंही काम असेल ते सर्व सोडून मतदानाचा हक्क बजावा अशी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने सर्वांना मार्गदर्शन करून गावांमध्ये रॅली काढून गावातील ग्रामस्थांना मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली आहे. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या वतीने मतदानाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. एक मतदान किती मोलाचे असते हे सर्वांना पटवून सांगितले आहे. त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धनवटे जुनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री मनोज सर घाडगे पाटील. टी पी एस चे प्राचाआशिष भारती सर विभाग प्रमुख प्राध्यापक श्रीराम बडे सर डीएड कॉलेजचे प्राचार्य श्री नवल सर इतर शिक्षिका शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मतदानाविषयी सर्व गावातील ग्रामस्थांना मतदानाविषयी जनजागृती केली आहे. आपला मतदानाचा हक्क एक मत किती मोलाचे असते हे जनजागृती मध्ये पटवून दिले आहे.

error: Content is protected !!