ब्रेकिंग न्युज
घुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडित

शुक्रवारी बीडमध्ये मोफत मुळव्याध तपासणी महिलांसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती बीडच्या सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटलचा उपक्रम

शुक्रवारी बीडमध्ये मोफत मुळव्याध तपासणी
महिलांसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती
बीडच्या सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटलचा उपक्रम
बीड । प्रतिनिधी;-मुळव्याधाच्या रुग्णांसाठी मुळव्याध तज्ज्ञ डॉ. अमोल खेत्रे यांनी बीडमध्ये मोफत मुळव्याध तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टिम पूर्णपणे मोफत तपासणी करणार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे. हे शिबीर  बीड शहरातील जालना रोड येथील सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल येथे शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी  होणार आहे. शिबीरातील रूग्णांना औषध उपचारातही सुट देण्यात येणार आहे.
मुळव्याध-भगंदर-फिशरचे लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तपासणी न केल्यामुळे मुळव्याध हा आजार वाढतच जातो. आणि त्याचे दुष्परिनाम भविष्यात रूग्णांना सहन  करावे लागतात. सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल बीडच्या वतीने मुळव्याध- भगंदर-फिशरची मोफत तपासणी शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत करण्यात आले आहे. बीड शहरातील जालना रोड येथील डी.सी. लोढा कॉम्लेक्स, मंत्री बँकेच्या शेजारी असलेल्या सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल येथे हे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. मुळव्याध-भगंदर-फिशर याचे लक्षणे मलप्रवृत्तीच्या वेळेस किंवा नंतर रक्त पडणे, शौच्याच्या जागेवर आजुबाजुला गाठ येणे, त्यामधून चिकट स्त्रव व रक्त येणे, शौचाच्या जागी आग होणे, वेदणा होणे, टोचल्यासारखे वाटणे, शौचाच्या वेळेस मांसल गोल आकराचा भाग बाहेर येणे इत्यादी लक्षणे असल्यास त्याची तत्काळ तपासणी करुन त्यावर निदान करता येते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार बळावतो. त्यासाठी तपाणी करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे. या हॉस्पिटलमध्ये गुदगत आजारांसाठी क्षारसुत्र, क्षारकर्म, आग्रिकर्म सुरक्षित आयुर्वेदिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत. या शिबीरामध्ये फोनवरही नाव नोंदणी करण्याची सुविध्दा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी रुग्णांनी  डॉ. सौ. शिल्पा ८६००२८७९७२, डॉ. अमोल खेत्रे ७५१७७४७९७२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे असे अवाहन डॉ. अमोल खेत्रे यांनी केले आहे.
error: Content is protected !!