ब्रेकिंग न्युज
सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबाआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदिप थोरवेपंकजाताईच राजकारण सर्व समावेशक ,त्या खासदार होण , बीड जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला करणजिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय ‘ मशिन अभावी तर स्वरातीचे सिटी स्कॅन ४ महिन्यांपासून बंद रूग्णांची हेळसांड  ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळेघुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धस

संविधान वाचविण्यासाठी मी जिल्ह्याचा खासदार होऊन संसदेत जाणार – बजरंग सोनवणे

संविधान वाचविण्यासाठी मी जिल्ह्याचा खासदार होऊन संसदेत जाणार – बजरंग सोनवणे
घटना बदलायची भाषा करणाऱ्यांना सणसणीत चपराक
बीड :मी बीड जिल्ह्याचा खासदार होऊन संसदेत जाणार असून संविधान वाचविणार अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी संविधान बदल्याची भाषा करणाऱ्या भाजपला चपराक  लगावली आहे.
बीड येथील छ्त्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे महागायक आदर्श शिंदे यांच्या बहारदार गीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. २३) बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले होते. या कार्यक्रमात आंबेडकरी अनुयायांना शुभेच्छा देताना बजरंग सोनवणे हे बोलत होते. त्यांनी संविघान बडदल्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला खडसावित मी बीड लोकसभेची निवडणूक जिंकणार असून खासदार होऊन संसदेत संविधान वाचविण्यासाठी जाणार आहे. असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. संदीप क्षिरसागर, युवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार सय्यद सलिम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर यांच्या हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
error: Content is protected !!