ब्रेकिंग न्युज
घुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडित

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी..

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी..
गेवराई प्रतिनिधी ;-यवतमाळ येथे एका अज्ञात माथेफिरू ने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर शाही फेकल्याने समाजात रोष निर्माण होत असून त्या माथेफिरू विरोधात गुन्हा नोंद करून कडक कार्यवाही करावी अशी मागणी  गेवराई येथील नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
   यवतमाळ येथील आझाद मैदान येथे असलेल्या क्रांतीसूर्य,शिक्षणमहर्षी महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर अज्ञात माथेफिरू ने शाही फेकून महामानवाची विटंबना केली असल्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत,हे असले कृत्य करून समजा समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होत आहे त्यामुळे असून फुले,शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा देशात पुरोगामी विचारांना तिलांजली देण्याचे काम करण्यात येत आहे,महात्मा फुले देशातील समाजाचे प्रेरणास्थान आहे त्यामुळे या घटनेने समाज बांधवांचे मन दुखवले असून सदरील माथेफिरू जो कोणी असेल त्याच्या विरोधात कायदेशीर गुन्हा नोंद करून कडक कार्यवाही करावी अशी मागणी गेवराई चे नायब तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत सरकारकडे समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापू गाडेकर,किशोर वादे,महेंद्र जवंजाळ,शुभम जवंजाळ यांच्या सह समजा बांधवांच्या वतीने
निवेदनाद्वारे केली आहे.
error: Content is protected !!