ब्रेकिंग न्युज
घुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडित

शालेय कामी तीन शिक्षक गैरहजर ; गटशिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई कडे लक्ष

शालेय कामी तीन शिक्षक गैरहजर ; गटशिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई कडे लक्ष

सरपंच, सदस्य, ग्रामस्थांच्या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी यांची मोहा शाळेला भेट

जामखेड तालुक्यातील मोहा गावाचे सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सततच्या तक्रारींनुसार जामखेड पंचायत समितीचे कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मोहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली .त्यावेळी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. त्याठिकाणी नियमबाह्य रित्या तीन शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. यामुळे आता गटशिक्षणाधिकारी या शिक्षकांवर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे .
जामखेड तालुक्यातील मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक शालेय कामी वारंवार गैरहजर राहतात. मुलांना शिकवत नाहीत. अशा तक्रारी अनेक तक्रारी
मोहा गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या वतीने वारंवार येत होत्या. त्या तक्रारींची दखल घेत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मोहा शाळेला आज दि .२३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी अचानक भेट दिली असता. पारखे मल्हारी आप्पा, साखरे रजनीकांत रोहिदास, जाधव विजय सुभाष हे शिक्षक शालेय कामी गैरहजर दिसून आले.
यापूर्वीही हेच शिक्षक शालेय कामी गैरहजर दिसून आले होते. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात व कामकाजात बदल झाला नाही. तसेच माहे मार्च २०२४ रोजी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, यांनी या शाळेची वार्षिक तपासणी केली असता. सर्व मुले अप्रगत दिसून आले. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अश्या बेजबाबदार शिक्षकांवर कडक कायदेशीर व खात्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी मोहा गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली असून आता गटशिक्षणाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!