ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

अनलॉक मुद्द्यावरून झालेल्या गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

अनलॉक संदर्भातील घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर झालेल्या निर्माण झालेल्या गोंधळावरुन भाजपाने जोरदार टीका महाविकास आघाडी सरकारवर केली होती. राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवल्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली आणि गुरुवारी एकच गोंधळ उडाल्यामुळे सारे निर्बंध शिथिल झाले, असे चित्र निर्माण झाले होते. पण असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले.

दरम्यान या सर्व गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. सरकारमध्ये अनलॉकबाबत पूर्णपणे सुसंवाद असून जेव्हापासून राज्यात कोरोना आला तेव्हापासून राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. त्यानंतर मग अनेकदा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे भूमिका मांडत असतात. विजय वडेट्टीवार यांनी एक शब्द राहून गेला होता, त्यामुळे गैरसमज झाला होता, असे स्पष्ट केले आहे. शेवटी सरकार कोणाचेही असले तरी राज्याचे मुख्यमंत्री सांगतील, तो अंतिम निर्णय असतो, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राज्यातील काही जिल्ह्यांत लॉकडाऊन काढण्याचा प्रस्ताव असून त्यास आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत तत्त्वत: हा शब्द विसरून गेलो, असे स्पष्टीकरण दिले होते.

error: Content is protected !!