ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अथवा न राहू खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल – संजय राऊत

मागच्या काही दिवसांपासून खेड पंचायत समितीतील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात दाखल केेलेला अविश्वास ठराव ११ विरुध्द ३ अशा मतांनी मंजूर झाला .२४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी थेट खेड गाठत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. याचवेळी त्यांनी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांवर जोरदार टीका केली आहे. तसेच आम्ही देखील फोडाफोडी करू शकतो. खेडच्या आमदाराची वागण्याची पद्धत हीच राहिली तर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल अशा शब्दात गर्भित इशारा दिला आहे.

संजय राऊत यांनी खेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक कुरघोडीच्या राजकारणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना असे खेड तालुक्यात कुरघोडी होत असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी विचार केला पाहिजे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेडमध्ये मात्र राजकीय कुरघोडीच्या वारंवार घटना घडत आहेत असे आहे त्यांनी बोलून दाखविले होते.

error: Content is protected !!