ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

बटवाडीकडे निघालेले धान्य वाशिमच्या काळ्या बाजारात; सेनगाव तालुक्यातील प्रकार.

बटवाडीकडे निघालेले धान्य वाशिमच्या काळ्या बाजारात; सेनगाव तालुक्यातील प्रकार.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️परमेश्वर सावंत | हिंगोली.
हिंगोली येथील तहसील कार्यालयाच्या गोदामातून बटवाडीकडे निघालेले स्वस्त धान्याचे २०८ कट्टे धान्य थेट वाशिमच्या काळ्याबाजारात पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. १८) रात्री उघडकिस आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी हा प्रकार उघडकिस आणला असून प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.गोरगरीबांच्या घरातील चुल बंद होऊ नये याची काळजी म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून मोफत धान्य पुरवठा केला जात आहे. मात्र सेनगाव येथील पुरवठा विभागातुन धान्याचा काळा बाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. संबंधित अधिकारी व गोदामपाल यांच्या मिलीभगतने लाभार्थ्यांना आलेले धान्य वाटप न करता साठवणूक करुन ते रिसोड व वाशिमच्या काळ्या बाजारात विक्री केले जात आहे. सायंकाळी सहा वाजता सेनगाव येथील तहसील कार्यालयाच्या गोदामातून एका टेम्पो ( एम.एच.२६ ए.डी.०६३७) यामध्ये स्वस्त धान्य बटवाडी येथील दुकानदाराच्या नावे १२७ कट्टे गहू व ८१ कट्टे तांदूळ असे एकूण २०८ कट्टे धान्य शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता भरण्यात आले होते. त्यानंतर हा टेम्पो बटवाडी येथे जाणे अपेक्षीत होता. सेनगाव येथून निघाल्यानंतर हा टेम्पो गोरेगाव ते वाशिम रोडवर कोकलगाव ते विरेगावच्या मध्ये थांबविण्यात आला. त्यानंतर वाशिम येथून आलेल्या एका खासगी वाहनामध्ये टेम्पोतील सर्व धान्याचे कट्टे भरुन ते वाहन वाशिमकडे गेले. तर रात्रीच्या वेळी रिकामा असलेला टेम्पो बटवाडी येथे आणला जात होता. या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास बटवाडी गाव गाठले. यावेळी रिकामा टेम्पो आल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टेम्पो चालकाची चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये त्याने सविस्तर माहिती दिली. त्यानंतर या प्रकाराची माहिती सेनगाव तहसील कार्यालयास देण्यात आली. त्यानंतर सदर रिकामा झालेला टेम्पो व चालकास गोरेगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. या प्रकाराची चौकशी सुरु असल्याचे गोरेगांव पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आता तहसील प्रशासन काय भुमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागुन आहे. सेनगाव तालुक्यात सतत होत असलेला धान्याचा काळा बाजार कधी थांबणार? असा प्रश्न सुध्दा लाभार्थी वर्गातुन उपस्थित केला जात आहे.येथे क्लिक करा – या प्रकाराची चौकशी सुरु आहे. आमचे सर्व लोक तिथे बसलेले आहेत. मात्र काहीअडचणी येत आहेत. बाकी सगळे विषय चौकशीत स्पष्ट होतील. आमचं काम फक्त गुन्हा दाखल करणे आहे. जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते सगळे ते अहवाल बनवने सुरु आहे.- जीवनकुमार कांबळे, तहसीलदार, सेनगाव .

error: Content is protected !!