ब्रेकिंग न्युज
घुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडित

आपल्याला सावरकरांविरुद्ध नव्हे मोदींच्या भाजपविरुद्ध लढायचंय!

 

‘मी सावरकर नव्हे, गांधी आहे. मी माफी मागणार नाही’, या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. आपल्याला सावरकरांविरुद्ध नव्हे तर मोदींच्या भाजपविरुद्ध लढायचंय त्यापासून विरोधकांनी दूर जाणे योग्य नसल्याचे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री विरोधी पक्षातील नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या बैठकीस सोनिया गांधी, राहुल गांधीही उपस्थित होते.

या बैठकीत शरद पवार यांनी आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावर आपण चर्चा करायला हवी. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएसचा संबंध नाही. ते कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नव्हते. सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी भूमिका मांडली. तसेच राहुल यांच्या विधानाचा फटका राज्यात महाविकास आघाडीला बसू शकतो, याची जाणीव करून देत पवारांनी काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला.

सोनिया गांधींच्या समक्ष शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे तसेच राहुल गांधी यांनी आपण पवारांच्या मताचा आदर करत असल्याचे सांगत सावरकरांच्या मुद्दय़ावर नरमाईची भूमिका घेतली. काँग्रेस अध्यक्ष खरगे यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते. भाजपविरोधात लढण्याच्या व्यापक उद्देशाने विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांची राजकीय विचारसरणी वेगवेगळी आहे तरीही, आम्ही एकमेकांशी जुळवून घेत आहोत, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!