ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

वीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं : प्रा . आर .के. चाळक 

वीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं : प्रा . आर .के. चाळक
गेवराई | प्रतिनिधी;-ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ साली भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना लाहोर जेल मध्ये संध्याकाळी ७.३० वाजता फाशी दिली होती. या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी 23 मार्च दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आर . के. पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात  आली . भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं असे प्रतिपादन प्रा. आर .के. चाळक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पार्थ प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता चाळक व आर के पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आर. के. चाळक उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी भगतसिंह राजगुरू सुखदेव या वीर क्रांतिकारी शहिदांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विद्यार्थ्यांना वीर क्रांतीकारी भगतसिंह राजगुरू सुखदेव यांच्या कार्याविषयी ओळख करून देश प्रेम जागृत व्हावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या शेवटी आभार सुनील चौधरी  यांनी मानले . आणि सूत्रसंचालन  सहशिक्षिका कोमल गौंड यांनी केले.
————————————
चौकट बोल्ड
23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. शहीद दिवस म्हणून ओखळला जाणार हा दिवस खरंतर भारतीय इतिहासासाठी एक काळा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे नायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्शस्थानी आहेत. भारत मातेची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी, यासाठी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं.
प्रा. आर. के. चाळक
error: Content is protected !!