ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील बाभळीच्या विळख्यामुळे वाहनचालक त्रस्त अखेर ग्रामस्थांनी साईड पंख्यावरील बाभळीची झाडेझुडपे काढली :- डॉ.गणेश ढवळे

मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील बाभळीच्या विळख्यामुळे वाहनचालक त्रस्त अखेर ग्रामस्थांनी साईड पंख्यावरील बाभळीची झाडेझुडपे काढली :- डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:- अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान साईडपंख्यावर बाभळीच्या झाडांचा विळखा पडला असुन पादचारी तसेच दुचाकी वाहनचालकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.सकाळी व्यायामासाठी जाणा-यांच्या अडचणीत वाढ झाली होती.संबधित प्रकरणात एचसीपीएल कंपनीने देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने कंत्राटदाराची सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे व पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी तहसीलदार सुहास हजारे यांना प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार दिली होती.त्याअनुषंगाने तहसीलदार यांनी एचसीपीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटीस सुद्धा पाठवली होती.या घटनेला महिना उलटूनही बाभळीच्या झाडांची तोड न केल्याने आज दि.२९ शुक्रवार रोजी सकाळी ग्रामस्थांनी साईडपंख्यावरील बाभळीच्या झाडांची साफसफाई करण्यात आली.यावेळी डॉ.गणेश ढवळे, हरिओम क्षीरसागर, विक्रांत वाणी, संतोष वाणी,कृष्णा वायभट,दादा गायकवाड, संतोष भोसले श्रीकांत शिंदे आदी सहभागी होते.

एचसीपीएल कंपनीने ४ वर्षांपासून एकदाही दुरुस्ती केलीच नाही:- डॉ.गणेश ढवळे

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावरील मांजरसुंभा ते चुंभळी फाटा रस्ताकाम एचसीपीएल कंपनीमार्फत करण्यात आले असुन देखभाल दुरुस्तीचा ५ वर्षाचा कालावधी असतानाही कंपनीने ४ वर्षांपासून एकदाही साईडपंख्यावरील झाडाझुडुपांची साफसफाईच नव्हे तर कुठल्याही प्रकारची देखभाल व दुरुस्ती केलीच नाही.संबधित प्रकरणात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर कार्यालयास लेखी तक्रार करण्यात आली आहे परंतु एचसीपीएल कंपनीकडून वरिष्ठ कार्यालयास नियमित देखभाल व दुरुस्ती केल्याचे लेखी कळवुन दिशाभूल केली जात आहे.

सकाळी व्यायाम करणारांना अडचणीचा सामना करावा लागतो:- हरिओम क्षीरसागर (पत्रकार)

धकाधकीच्या जीवनात आरोग्य उत्तम रहावे यासाठी सकाळच्या मोकळ्या हवेत फिरण्यासाठी जाणा-या ग्रामस्थांना साईड पंख्यावरील बाभळीच्या झाडांमुळे रस्त्यावरून चालावे लागते.पहाटे भरधाव वेगाने धावणाऱ्या चारचाकी वाहनांच्या धडकेने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अशा घटना घडलेल्या आहेत.त्यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या साफ सफाईमुळे कंत्राटदाराचे डोळे उघडले आणि देखभाल व दुरुस्ती करावी एवढीच माफक अपेक्षा.

error: Content is protected !!