ब्रेकिंग न्युज
आळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलसुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तनगेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरेतब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाहीजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पणमराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकरआम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे  डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचारपाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतबीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवले

वरवठणे कोंड येथे श्री.हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळा वरवठणे कोंड ग्रामस्थ मंडळ,ग्राम विकास मंडळ.मुंबई व गुरुकृपा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

वरवठणे कोंड येथे श्री.हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळा

वरवठणे कोंड ग्रामस्थ मंडळ,ग्राम विकास मंडळ.मुंबई व गुरुकृपा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

म्हसळा प्रतिनिधी – अबरार अमीन

म्हसळा तालुक्यातील वरवठणे कोंड येथे २८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजता श्री.हनुमान मंदिराचे लोकार्पण व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, यानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन वरवठणे कोंड ग्रामस्थ मंडळ,ग्राम विकास मंडळ.मुंबई व गुरुकृपा महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेले आहेत.

यासह गुरुवारी २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजल्यापासुन धार्मिक कार्यक्रम, मिरवणूक, पूजन विधी व सुस्वर भजन. त्या नंतर शुक्रवारी २७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी कलश रोहन,श्री.मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा, श्री.शिवलिंग महाभिषेक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढे शनिवार २८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सत्य नारायण महापूजा आणि दुपारी ठीक ३ वाजत उद्घाटन समारंभ व प्रमुख मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतीय सैन्य दलाच्या सुभेदारांना उदघाटक म्हणून आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या हस्ते मंदिराचे उदघाटन करण्यात येणार आहे.

तरी सदर कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविण्याची विनंती वरवठणे कोंड ग्रामस्थ मंडळ,ग्राम विकास मंडळ.मुंबई व गुरुकृपा महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.

error: Content is protected !!