ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांकरता निलंबित

 

मुंबई:अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे.महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने ही कारवाई केली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी वकिली आचारसंहितेचं उल्लंघन करुन, वकिली गणवेशात आंदोलनात भाग घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते आता दोन वर्षांसाठी कोणत्याही कोर्टात वकिली करु शकणार नाहीत, किंवा कुणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत.

वकिलांसाठी एक आचारसंहिता असते, त्याचं उल्लंघन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. वकिलीची वेशात सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केल्याचं ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावरुन सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या आंदोलनाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. दोन वर्षासाठी आता सदावर्ते कोणत्याही कोर्टात वकिली करु शकणार नाहीत, कुणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल या निर्णयाला अॅड. गुणरत्न सदावर्ते हे आव्हान देणार असल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!