ब्रेकिंग न्युज
देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान १७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरीगेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकीगेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुचतहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नगेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटलाडॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कारपैठण – रामपुरी बस तलवाडा बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांचे हाल…जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले

शेतकरी व समीतीच्या हीताआड येणाऱ्यांना जागा दाखवणार ! अनंत साबळे

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनीधी

28 एप्रिलला होणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समीतीच्या निवडणुकीत सहकार पॅनलने नवतरुणांसह, अनुभवी बेदाग चेहऱ्यांना समीतिवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी उमेदवारांकडून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाचे खंडन करण्यासाठी दि.२३ ला सहकार पॅनल तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मागील कृषि उत्पन्न बाजार समीतीच्या संचालकांनी बाजार समीतीने अधीग्रहीत केलेल्या जमीनीच्या अधीग्रहणात केलेला संधीसाधुपना व जमीनीच्या अवतीभोवती फीरणाऱ्या राजकारणात बाजार समीतीची खुंटलेली प्रगती दृस्टीक्षेपात ठेऊन, समीतीच्या सर्वांगीन विकासाचे उद्दिष्ट व शेतकऱ्यांचा फायदा व बाजारसमीतीचा विकास थांबणाऱ्या दोषींवर कारवाई, गतपंचवार्षिक मध्ये तूर खरेदीत झालेला भ्रष्टाचार, सचिवावर लागलेले आरोप, बाजार समितीच्या उत्पन्नात संचालक व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने होत असलेली घट तथा गेल्या पंचवार्षिक मधील संपूर्ण भ्रष्टाचार हा बाजार समितीला लागलेला काळा डाग पुसण्यासाठी सहकार पॅनल सर्वतोपरी प्रयत्न करून, या मुद्द्यावरच निवडणुक लढवली जाईल असे सहकार पॅनल च्या वतीने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सहकार गटाचे नेतृत्व करणारे नेते अनंत साबळे व शशिकांत मंगळे यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले.

कृषी उत्पन्न बाजार समीतीचे 16 पैकी 15 संचालक बाजारसमीतीची निवडणुक 6 वर्षाकरीता लढण्यास अपात्र झाले हा तालुक्याचे सहकाराला लागलेला बट्टा आहे, मागील संचालक मंडळाकडुन बाजारसमीतीची झालेली बदनामी न भरणारी असुन बाजार समीतीला अधीग्रहीत झालेल्या सोन्याच्या कीमतीची जमीन खरेदीच्या मुद्याला प्राथमिकता व प्राधान्य असेल. करोडो रुपयाचे जमीनीवर शेतकरी प्रशिक्षण केंद्र, टी.एम.सी नाशवंत मालाकरीता कोल्डस्टोरेज,निवास व भोजन व्यवस्था, शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्न व ईतर कार्याकरीता मंगलकार्यालय, झुनकाभाकर केंद्र, बाजारसमीतीचे ऊत्पन्न जे कापुस सेस धान्य, भाजीपाला, मीरची, गुरांची विक्री या माध्यमातून ज्या प्रमाणत मीळयला पाहीजे ते मिळवण्याचे साडेतीन ते चारकोटीचे उद्दिष्ट ठेउन विकास करण्याचा संकल्प करुण आम्ही नव्यादमाच्या नवतरुणांच्या साथीला अनुभवी बेदाग व शेतीहाच ज्यांचे उपजीवेकेचे प्रमुख साधन म्हणुन, ज्यांना शेतकऱ्यांचे समोरील आव्हानांची जान आहे अश्या उमेदवारांनाच बाजारसमीतीवर संधी दिली असुन, विरोधकांन जवळ कोणताही मुद्दा नसुन ते फक्त संचालक पदावर डोळा ठेऊन निवडणूक लढत आहेत, त्यांना पराभवाची भीती वाटत असल्याने ते आमच्या उदवाराचे विरोधात उच्च न्यायालय नागपुर पर्यत जाऊन उमेदवारी रद्द करण्याचा त्यांचा प्रयत्न असफल झाला असुन, निवडणुकीचे पुर्वीच कोर्ट कचेऱ्या करणारे विरोधक कोर्ट कचेऱ्या करण्यासाठी निवडणुकीत उभे आहेत काय? असा प्रती सवाल करीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत साबळे हे सभापती पदाचे उमेदवार नसून ते सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य असल्याने,तसेच त्यांना कायद्याचे ज्ञान असल्याने त्यांना बाजार समितीमध्ये सर्वांच्या सहमतीने उमेदवारी दिल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांनी व मतदारांनी बाजारसमीतीच्या सर्वांगीन विकासाकरीता सहकार पॅनलला बहुमताने निवडुन देण्याचे आव्हान यावेळी केले. यावेळी सहकाराचे नेते अनंत साबळे, शशीकांत मंगळे, अशोक चरपे, अमोल घुरडे, शरद कडु प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!