ब्रेकिंग न्युज
आळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलसुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तनगेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरेतब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाहीजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पणमराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकरआम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे  डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचारपाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतबीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवले

मदर वेरोनिका कौटुंबिक केन्द्र भंडारज च्या योग्य मार्गदर्शनामुळे कित्तेक कुटूबांना मिळाला न्याय

अंजनगांव सुर्जी – अमरावती जिल्हयातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज येथिल मातृछाया सोशल सेंटर अंतर्गत मदर वेरोनिका कौटुंबिक समुपदेशन केन्द्र कित्तेक वर्षांपासुन कौटुंबिक कलहामध्ये यशस्वी मध्यस्थी करून कित्तेक कुटुबांना न्याय मिळवुन देण्याचे अविरतपणे काम करित आहे.

कोरोना काळात कौटुंबिक कलहाचे प्रकरणे वाढली असता या कठिण आणीबानीच्या काळातही मदर वेरोनिका कौटुंबिक समुपदेशन केन्द्राने यवस्वी पुढाकार घेत, वादी आणि प्रतिवादी कुटुबांत समुपदेश करीत समेट घडवुन आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अशातच दिनांक 21 मार्च 2024 रोजी अचलपुर येथील मुलगा व शिरजगांव येथिल मुलगी ह्या वैवाहिक जोडप्यात काही कारणात्सव कौटुंबिक वाद निर्माण झाला. त्यांना काय करावे सुचत नव्हते. कौटुंबिय सर्व मार्गाने प्रयत्न करून हतबल झाले असता, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांना मदर वेरोनिका कौटुंबिक समुपदेशन केन्द्र भंडारज विषयी माहिती दिली. पिडित मुलीने मदर वेरोनिका कौटुंबिक समुपदेशन केन्द्रात प्रकरण दाखल केले असता, या केन्द्रातील समुपदेशकांनी दोन्ही बाजु ऐकून घेऊन एका महिन्यातच त्यांच्यामधे मध्यस्ती करून योग्य समुपदेशनाच्या माध्यमातुन त्या पिडीत मुलीला न्याय मिळवुन देण्याचे काम केले.

यावेळी अॅड. सिस्टर हिरा पारखे यांचे मार्गदर्शनात सिस्टर शेराफिन सह कौन्सिलर श्रीमती आशा दाभाडे यांनी काम पाहिले. या कामगीरीबद्दल पिडीत कुटुंबियांनी मदर वेरोनिका कौटुंबिक समुपदेशन केन्द्र भंडारज टिमचे शतश: आभार मानले.

error: Content is protected !!