ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

भक्ती कन्स्ट्रक्शन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर  जयंती मोफत पाणपोई सह विविध उपक्रम राबवून साजरी.

भक्ती कन्स्ट्रक्शन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर  जयंती मोफत पाणपोई सह विविध उपक्रम राबवून साजरी.
वाघमारे बंधू माणिक व संजय यांचे कार्य उल्लेखनीय-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिपादन
बीड प्रतिनिधी;- एकनाथ नगर भक्ती कन्स्ट्रक्शन बीड येथे प्रतिवर्षीप्रमाणे महामानव जन्मोत्सव समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष माणिक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबऊन मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून भंते धम्मशील व बौद्धाचार्य सदाशिव कांबळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर हे उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सुभाष सपकाळ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष अरुण डाके,मा.दिनकराव कदम, दूध संघाचे चेअरमन विलास बडगे माजी नगरसेवक विलास विधाते गजानन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष राजेश पिंगळे माजी नगरसेवक मुकुंद भालेकर प्रसिद्ध डॉ.सुभाष जोशी शेळके कन्स्ट्रक्शन चे मालक शहादेव शेळके , गणेशजगताप,  बबन राठोड, प्रशांत पवळ सर इत्यादीं मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की भक्ती कन्स्ट्रक्शन परिसर हा सर्व जाती धर्माचा व सर्वधर्म समभाव जपणारा आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासणारा असा हा परिसर आहे भक्ती नावाप्रमाणेच सर्व परिसर हा भक्तीमय आहे  या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून या परिसरातील सर्वांना परिचित असलेले वाघमारे बंधू माणिक आणि संजय व त्यांचे सहकारी विविध सामाजिक उपक्रम,विविध स्पर्धा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना विविध पुरस्काराचे वितरण, कामगारांना मदत, आरोग्य शिबिर,विविध सामाजिक उपक्रम राबवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन साजरी करतात या महापुरुषांचे विचार खर्‍या अर्थाने समाजात जोपासण्याचे ते काम करतात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श अचारसंहिता चालू असल्यामुळे मी त्यांना कार्यक्रम छोट्या स्वरूपाचा घेऊन आदर्श आचारसंहितेचे पालन करावे अशी सूचना केली होती त्याप्रमाणे आता ऊन खूप आहे उन्हाळा तीव्र आहे आणि अशावेळी मोफत पाणपोई व अन्नदान करणे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवने हे पुण्याचे काम असून त्याबद्दल दोन्ही बंधूंचे व त्यांच्या सर्व उत्सव समितीचे अभिनंदन करतो आणि सर्व समाज बांधवांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो असे म्हणून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमास भक्ती कंट्रक्शन परिसरातील शेकडे साहेब, हाडे साहेब, नाईक साहेब, डॉ संपत वाघमारे ,लक्ष्मण वंजारे ,सुनिल  कुलकर्णी,चंद्रशेन वंजारे,विजय तरकसे,माजी पोलीस अधिकारी ,भागवतराव वाघमारे व विठ्ठलराव सरोदे, पत्रकार जोशी साहेब, माझी प्रशासकीय अधिकारी के एस वाघमारे, शिवाजी कुलकर्णी, प्रा. जोगदंड सर ,प्रा.भोसले सर, प्रा.कंधारे सर,लक्ष्मण  सोनवणे उत्तम वाघमारे, बाळासाहेब वाघमारे ,आत्माराम वाघमारे, विजय वाघमारे ,नवनाथ वाघमारे, राहुल वाघमारे, मसु वाघमारे असंख्य मान्यवर महिला भगिनी उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महामानव जन्मोत्सव समितीचे निमंत्रक मा.आमोल भैय्या बारस्कर यांनी व सर्व समितीने खूप मेहनत घेतली  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वाघमारे यांनी केले .
error: Content is protected !!