ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान संपूर्ण शिक्षण विभागासाठी गौरवास्पद- गटशिक्षणाधिकारी पोले

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान संपूर्ण शिक्षण विभागासाठी गौरवास्पद- गटशिक्षणाधिकारी पोले

जिंतूर प्रतिनिधी- आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा प्रशिक्षण व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. जिंतूर तालुक्यातील सर्व विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षेसाठी तयार झाले पाहिजेत आणि त्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळाले पाहिजे यासाठी विभागाकडून वर्षभरात विशेष मार्गदर्शन तासिका व सराव परीक्षा याचे नियमितपणे आयोजन करण्यात आले. यासोबत शाळा स्तरावर शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात आले. शाळास्तरावर, केंद्रस्तरावर, तालुकास्तरावर सातत्याने सराव परीक्षेचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सराव करून घेण्यात आला. सराव परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा वेळोवेळी गौरव करण्यात आला.

या सर्व प्रयत्नामुळे जिंतूर तालुक्यातून नवोदय विद्यालयाच्या त्यासाठी 13 विद्यार्थी पात्र झाले. NMMS या शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. तर CBSC बोर्डाची आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यानिकेतन लोणावळा या शाळेच्या प्रवेशासाठी 01 विद्यार्थिनी पात्र झाली. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान शिक्षण विभागाद्वारे करण्यात आला. याप्रसंगी बोलताना गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा संपूर्ण शिक्षण विभागाचा सन्मान आहे. आपण वर्षभरात घेतलेल्या परिश्रमाचे हे फळ आहे. पुढील वर्षासाठी आत्तापासून नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करावयाची आहे. पुढच्या वर्षभरात अधिक प्रभावीपणे शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे उपक्रम राबवून जिंतूर तालुक्याचे नावलौकिक वाढवावयाचे आहे. यासाठी सर्व विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे. तसेच शाळा पूर्वतयारी मेळावा शाळा स्तरावर व केंद्र स्तरावर अतिशय प्रभावीपणे आयोजित करावा.

या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या शाळेची गुणवत्ता आणि सोयीसुविधी बद्दल सर्वांना माहिती होणे अपेक्षित आहे. आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांची पदसंख्या वाढली पाहिजे. यासोबतच या शाळा पूर्वतयारी मेळाव्यामध्ये मतदार जनजागृती करणे अपेक्षित आहे. दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या मतदारांमध्ये सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन यानिमित्ताने करण्यात यावे. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी पोले यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे, मंगेश नरवाडे, नवनीत देशमुख, केंद्रप्रमुख मारोती घुगे, पांडुरंग भांबळे, शिवाजी कऱ्हाळे, मुख्याध्यापक केशव घुगे, अनिल स्वामी, वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र ढाकणे, लक्ष्मण टाकणसार, रत्नमाला तोडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी केले.

error: Content is protected !!