ब्रेकिंग न्युज
महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या कार्यालयास भेट ..!सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबाआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदिप थोरवेपंकजाताईच राजकारण सर्व समावेशक ,त्या खासदार होण , बीड जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला करणजिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय ‘ मशिन अभावी तर स्वरातीचे सिटी स्कॅन ४ महिन्यांपासून बंद रूग्णांची हेळसांड  ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळेघुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडे

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पराभूत करणाऱ्यास ‘सोन्याचा मुकुट’

 

राजकारणात आपल्याला कोण धक्का देणार नाही, असे सांगलीतल्या एका मोठ्या नेत्याला वाटत होते, पण भाजपने त्यांना यापूर्वी धक्के दिले आहेत. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना शॉक देणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला मी सोन्याचा मुकुट देणार आहे,’ अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर केली.

चंद्रकांत पाटील सांगलीत भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच सांगली महापालिका आणि इस्लामपूर नगरपरिषदेत सत्तांतर घडवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राजकीय धक्के दिले आहेत. आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘सांगलीतल्या एका मोठ्या नेत्याला असे वाटत होते की, राजकारणात आपल्याला कोण धक्का देणार नाही, पण यापूर्वीच भाजपने त्यांना धक्के दिले आहेत. आता आगामी निवडणुकांमध्ये त्यांना शॉक देणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला मी सोन्याचा मुकुट देणार आहे. हा मुकुट कोण मिळवणार ते पाहूया. राज्यात शरद पवार हे भाजपसाठी आव्हान नाहीत. ५६ च्यावर त्यांचे कधीही आमदार निवडून आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसाठी आव्हान ठरू शकत नाही, असेही विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

error: Content is protected !!