ब्रेकिंग न्युज
पंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागरसंत तुकाराम मंदिर तळेगाव येथे निवासी संस्कार शिबिराचे आयोजनलिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीपंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडा डोअर टू डोअर मतदारांपर्यंतमादळमोही कोळगाव सर्कलमध्ये बजरंग सोनवणे यांच्या दौर्‍यामुळे मतदारांमध्ये उत्साह

लोकशाहि मराठी पत्रकार संघाच्या पत्रकाराने निडरपणे शोध पत्रकारिता करुन जनहितासाठी लढावे – प्रशांतभैया डोंगरदिवे.

लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांतभैय्या डोंगरदिवे यांनी लोकशाही पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.

प्रतिनिधी /जयश्री एडके.

चिखली :- लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले प्रदेश उपाध्यक्ष अमोल पाटील विदर्भ प्रदेश अध्यक्ष कैलास मोरे विदर्भ प्रदेश संपर्कप्रमुख उत्तम वानखेडे यांनी दिलेल्या आदेशावरून लोकशाही मराठी पत्रकार संघ बुलढाणा जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 6 फेब्रुवारी 20 22 रोजी शासकीय विश्रामगृह चिखली येथे संपन्न झाली.

यावेळी लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांतभैय्या डोंगरदिवे यांनी लोकशाही पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.हल्ली शोध पत्रकारिता करताना पत्रकारांना गुंतवल्या जात आहे त्यामुळे पत्रकारांनी शोध पत्रकारिता करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले .शिवाय पत्रकारावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सर्व पत्रकारांनी एकजूट केली पाहिजे .असे सुद्धा त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

सदर बैठकीला अध्यक्ष जेष्ठ पत्रकार तथा देऊळगाव राजा संपर्क प्रमुख हनिफ भाई शेख प्रमूख मार्गदर्शक प्रशांतभैय्या डोंगरदिवे जिल्हाध्यक्ष तर प्रमुख उपस्थितीत प्रशांत जैवाळ जिल्हा संपर्कप्रमुख प्रवीणकुमार काकडे जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे जिल्हा संघटक अमोल हरणे तालुका अध्यक्ष देऊळगाव राजा, राजेंद्र सुरडकर सामाजिक कार्यकर्ते हे होते.

सदर बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात येऊन सर्व लोकशाही मराठी पत्रकार संघाची व्याप्ती वाढविणे जिल्हा तालुका स्तरावर राहिलेले पदे भरणे, जिल्हा व तालुका कार्यकारीणी नाव नंबर पद ई मेल सह तयार करणे. तसेच अधिकृत ओळखपत्र साठी लागणारी नोंदणी फी जमा करणे नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार व त्यांना नियुक्तीपत्र देऊन संन्मान करण्यात आला. यामधे किरणताई वाघ यांना देऊळगाव राजा तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली.

 

सदर बैठकीचे आयोजन रवी मगर तालूका सचिव यांनी केले होते. तसेच सूत्रसंचालन तालूका उपाध्यक्ष कु. वंदनाताई गवई यांनि तर आभार प्रदर्शन कु. मेघाताई जाधव यांनी केले. यावेळी तालुका प्रभारी सतिषराजे पैठणे, प्रसिध्दि प्रमुख रघुनाथ गवई, सहसचिव कु. ऊमाताई सुरडकर, सदस्य, सौ लक्ष्मीताई गीर्‍हे  सिध्दार्थ वानखडे, दत्ता हांडे, राहुल कासारे, संतोष बनकर, मुन्ना ठाकुर, आकाश गवई, राजीव जाधव, समाधान वानखडे, चंद्रशेखर काळे, गणेश शिंदे, शेख अजहर, संकेत जाधव, अजय खंडागळे यांच्यासह लोकशाहि मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थीत होते.

error: Content is protected !!