ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने मंत्री.नवाब मलिक यांना केंद्र सरकारच्या ईडी कडून बेकायदेशीर अटके बद्दल केंद्र सरकारचा जाहीर निषेध व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले…

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने मंत्री.नवाब मलिक यांना केंद्र सरकारच्या ईडी कडून बेकायदेशीर अटके बद्दल केंद्र सरकारचा जाहीर निषेध व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

कुंबळे प्रतिनिधी / अल्पेश भोसले

 

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंत्री श्री.नवाब मलीक यांना केंद्र सरकारच्या सांगण्यावरून ईडी कडुन झालेल्या बेकायदेशीर अटके बद्दल केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याबतचे खेड तहसीलदार श्री.प्राजक्ता घोरपडे मॅडम यांना दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम व जिल्हाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तसेच राज्याचे मंत्री मा.ना.नवाब मलीक साहेब यांना केंद्राच्या दबावाने सक्तवसुली संचानालय विभागाने (ईडी) काही सुचना तसेच काही नोटीस न देता केवळ सुड बुद्धीने व आकसापोटी दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी जबरदस्तीने ताब्यात घेतले व त्यांच्या कार्यालयात नेले व अटक केली आहे.सदर अटकेची कारवाई ही पुर्णतः चुकीच्या पद्धतीने झाली आहे.म्हणुनच या घटनेचा रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचा व सक्तवसुली संचानालय विभागाचा जाहीर निषेध करत आहोत..

सदर वेळी दापोली विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रा अध्यक्ष श्री.मुजीब रूमाणे, गुहागर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य श्री.राजेंद्र आंब्रे,श्री.जलाल राजपुरकर,तालुकाध्यक्ष श्री.सतु कदम, महीला तालुकाध्यक्ष सौ.निधी विठ्मल,मा.युवक तालुकाध्यक्ष श्री.सचिन पवार,जिल्हा परिषद सदस्या नफिसा परकार,अल्पसंख्याक खेड अध्यक्ष श्री.मुख्तार कालेकर,खेड शहराध्यक्ष श्री.राजु शेठ संसारे,युवती शहराध्यक्षा अँड सौ‌.पुजा तलाठी,सवेणी ग्रामपंचायत सदस्य श्री.उमेश देवरूखकर,मा.पंचायत समिती सदस्य श्री.प्रकाश मोरे,मा.पचायंत समिती सदस्य श्री.श्रीधर गवळी,धामणी मा.सरपंच ग्रामपंचायत श्री.उमेश कदम,ऐनव्हरे मा.सरपंच श्री‌.संजय जाधव,भरणे ग्रामपंचायत सरपंच श्री.संदिप खेराडे,पोयनार ग्रामपंचायत सरपंच श्री.विचारे,ग्रामपंचायत सदस्या सौ.पड्याळ वहिनी,हेदली ग्रामपंचायत सदस्या सौ.हिना कुडुपकर,श्री.नितिन डेरवणकर,श्री.प्रदीप सकपाळ,श्री.आप्पा पवार,श्री.बबलु सकपाळ,श्री.आरीफ काणेकर,श्री.खलील कडवेकर,तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!