ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

जनतेला भेटणार कधी ते ऑफिसबाहेर लिहा, मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आदेश;

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांसह प्रशासनाला आदेश दिले आहेत. सामान्य नागरिकांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत भेटणार हे मंत्रालयातल्या दालनाबाहेर एका बोर्डवर लिहा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांना दिले आहेत. याशिवाय विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस तशी वेळ राखून ठेवावी असेही म्हटले आहे. या निर्णयामुळे सामान्य व्यक्तींना सुद्धा आता मंत्र्यांना भेटता येणार आहे.

सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याच विभागाकडून मंगळवारी सायंकाळी परिपत्रक जारी करण्यात आलंय. कामाचे स्वरुप लक्षात घेऊन मंत्र्यांनी अभ्यागतांना भेटी देण्यासाठी आठवडा, पंधरवडा, महिना यातले ठराविक दिवस आणि वेळ निश्चित करावी असे या परिपत्रकात म्हटले आहे. तसंच भेटण्याची वेळ आणि दिवस याची माहिती देणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा असेही आदेश दिले आहेत.

आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मृत्यू झालेल्या महिलेचं नाव शीतल असं आहे. महिलेच्या पतीच्या नावावर धुळे एमआयडीसीत प्लॉट होता. तो एमआयडीसी अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा आरोप महिलेने केला होता. त्यासंदर्भात महिला मंत्रालयात आली होती. त्यावेळी विष घेतल्यानंतर पोलिसांनी महिलेला जेजे रुग्णालयात दाखल केल. पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.

error: Content is protected !!