ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

शिवसेनेच्या एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण; तसेच लक्ष असणाऱ्यांना केली केली चाचणीचे आवाहन

 

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढताना दिसत आहे. राज्याच्या मोठ्या शहरांसह छोट्या शहरात ही आता कोरोना परत आहे. त्यातच आता मंत्र्यांना देखील कोरोना झाल्याने एकच चिंता व्यक्त होताना दिसत आहे. मागच्या वेळी कोरोना संसर्गामध्ये अनेक नेते मंडळींना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समीर आले होते अशातच पुन्हा एकदा राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे,

अशातच दोनची दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत देसाई यांनी स्वतःच माहिती दिली आहे.

शंभूराज देसाई यांनी, सोशल मीडियावर पोस्ट टाकत ही माहिती दिली आहे. त्यांनी, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करतो, असे म्हटलं आहे.

 

error: Content is protected !!