ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात आज धरणे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

 

कोल्हापूर । मराठा आरक्षणप्रश्नी सकल मराठा समाजातर्फे सोमवारी येथील पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय हिंदू एकताच्या कार्यालयातील बैठकीत झाला. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देसाई, ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. शिवाजीराव राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. देसाई म्हणाले, मराठा आरक्षणासाठीआंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढवत नेऊ. कोणाचाही जीव स्वस्त नाही. यामुळे सोमवारपासून ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांनी उपोषणाचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा. त्याऐवजी पापाची तिकटी येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करू. आरक्षणासाठी कायद्याची लढाई लढावी लागणार आहे. यासाठी विधी परिषद घेऊ.

तर ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी मुश्रीफ यांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. मात्र, बैठक झाली नाही. कोणताही मंत्री असो तो समाजाला फसवण्याचे काम करीत आहे. मराठा मंत्रीही मराठ्यांना विसरले आहेत. आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता नाही. भडकवण्याचे, फसविण्याचे काम ते करीत आहेत. त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.

error: Content is protected !!