ब्रेकिंग न्युज
सुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तनगेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरेतब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाहीजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पणमराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकरआम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे  डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचारपाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतबीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवलेमहायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या कार्यालयास भेट ..!सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबा

उत्तर सोलापूर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने “होऊ द्या चर्चा” या कार्यक्रमाचे आयोजन…..

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभुते

केंद्रातील भाजप सरकारने – जनतेला फसवून केवळ बोलघेवड्या घोषणा जाहीर केल्या. परिणामी या योजनांचा लाभ जनतेला मिळाला नाही.  त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून याचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘होऊ द्या चर्चा’ या अभियानांतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व 36 गावांमध्ये जाहीर सभांचे आयोजन शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पौळ यांनी दिली…..

सद्या शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 1 ते 12 ऑक्टोबरदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारने प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये देऊ, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, 2022 पर्यंत सर्वांना पक्की घरे देऊ, डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे दर कमी करू, महागाई कमी करू, महिलांवरील अत्याचार बंद करू अशा अनेक घोषणा केल्या होत्या. परंतू त्या सर्व खोट्या ठरल्या तसेच त्या प्रत्यक्ष अंमलात आलेल्या नाहीत. त्यामुळे शिवसेनेने हे विषय घेऊन थेट जनतेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी योजनांची पत्रके वाचून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड जनतेसमोर करण्यात येणार आहे….

होऊ द्या  चर्चा अभियानाचा शुभारंभ मौजे भागाईवाडी व पाकणी या दोन गावामधून होणार आहे. तसेच याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे, तालुका प्रमुख संजय पौळ, तालुका समन्वयक वजीर शेख, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हासंघटिका सुषमा ताई गुरव, शिवसेना महिला आघाडी तालुका संघटक परिनिता शिंदे, उपतालुका प्रमुख सदाशिव सलगर, उपतालुका प्रमुख सचीन घोडके, उपतालुकाप्रमुख अच्युतराव बाभळे, तसेच युवासेना उपजिल्हा अधिकारी प्रसाद निळ, तालुका अधिकारी अजिंक्य देशमुख यांच्यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेना युवासेना तसेच शिवसेना प्रणित सर्व संघटनांच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब गट तालुका उत्तर सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे….

error: Content is protected !!