ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य च्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी सोमिनाथ सावंत

वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य च्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी सोमिनाथ सावंत

जामखेड प्रतिनिधी;-वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्रच्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी जामखेड येथील सोमिनाथ रविंद्र सावंत वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मार्तंड साठे सर यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आली आहे. वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुणे, भोर येथील मार्तंड साठे सर हे आहेत. त्यांनी सोमिनाथ रविंद्र सावंत यांना जामखेड तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र दिले आहे.सावंत हे गेली काही वर्षे गोंधळाच्या माध्यमातून कुळधर्म, कुलाचाराबरोबरच सामाजिक कार्य करत आहेत. त्याचबरोबर गोंधळ कलेच्या माध्यमातून जनतेचे उद्बोधन, प्रबोधन ते करीत आहेत. लोककलावंतांच्याबाबतच्या त्यांच्या तळमळीला अधिकाधिक बळकटी यावी. वाघ्या मुरळी लोककलावंताचे चांगले कार्य व्हावे म्हणून वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकमताने जामखेड तालुका अध्यक्ष पदी त्यांची निवड करीत असल्याचे मार्तंड साठे यांनी सोमिनाथ सावंत यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर पश्चिम जिल्हा अध्यक्ष नानासाहेब साळुंखे, रविंद्र सावंत,जामखेड उपाध्यक्ष कृष्णा गरडकर, सचिव ईश्वर गरडकर,भूम तालुका अध्यक्ष प्रशांत धुमाळ, खर्डा उपाध्यक्ष पंडित वाघे आदी पदाधिकाऱ्यांनी सोमिनाथ सावंत यांचे या निवडीबाबत अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!