ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

शाम गदळे महाविद्यालयाच्या ‘रा.से.यो’ शिबिराचा समारोप संपन्न

शाम गदळे महाविद्यालयाच्या ‘रा.से.यो’ शिबिराचा समारोप संपन्न
भारतीय संविधान साक्षरता वाढविणे काळाची गरज – प्रा. डॉ .विठ्ठल जाधव
दहिफळ (वड.) : दि.२७ रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलग्नीत व श्री वडमाऊली विद्या प्रसारक मंडळ संचलित शाम गदळे कला व विज्ञान महाविद्यालय दहिफळ (वड.) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या “युवकांचा नारा, स्वच्छ समृद्ध भारत सारा” हे ब्रीद घेऊन आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय निवासी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा आज मौजे लिंबाचीवाडी येथे मोठ्या थाटात समारोप करण्यात आला. दिपप्रज्वलन करून सुरू झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्षा मा.डॉ. शालिनीताई कराड (मा. सदस्य महाराष्ट्र राज्य महिला आयोग ), प्रमुख पाहुणे संविधान अभ्यासक डॉ. विठ्ठल जाधव, श्री. तात्यासाहेब डोईफोडे, लिंबाचीवाडी गावचे मा. सरपंच भिकचंतद काकड, उपसरपंच मा. माने, श्री. हनुमंत हराळे, प्र. प्राचार्य अनंत मुंडे आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाने छोट्याशा गावात राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक करत आपल्या मार्गदर्शनपर  भाषणात संविधानातील मुलभूत कर्तव्य व अधिकारांची समाजातील प्रत्येक घटकाला योग्य ती जाण असावी. त्यासाठी समजातील सुशिक्षितंनी भारतीय संविधान साक्षरता करणे काळाची गरज बनली आहे. असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. तर आपल्या अध्यक्षीय समारोपपर भाषणात श्री वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्ष मा. डॉ. शालिनीताई कराड यांनी लिंबाचीवाडी गावाशी बालपणापासूनच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिंबाचीवाडी गावने दिलेल्या  प्रेमाचा, मायेचा ओलावा असाच अखंडपणे कायम रहावा अशी इच्छा व्यक्त केली. या वेळी स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. तात्यासाहेब डोईफोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य अनंत मुंडे यांनी सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. कृष्णा नागरे यांनी करून दिला. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. शांता जाधवर यांनी तर आभार प्रा. संतोष शिंदे यांनी मानले. यावेळी डॉ. प्रकाश चिलवंत, डॉ. बापू गुजर, डॉ. बन्सी पाटोळे, प्रा. विठ्ठल शिंदे, उपप्राचार्य प्रा.गंदगे सर, रा.से.यो. विद्यार्थी प्रतिनिधी कु. कोमल सानप, गोकुळ डोईफोडे यांच्यासह शाम गदळे महाविद्यालय, शाम माध्य. व उच्च माध्य. विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी – विद्यार्थिनी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!