ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

समाजविकासात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असते : डाॅ.विशाल जाधव

समाजविकासात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असते : डाॅ.विशाल जाधव

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला आणि विज्ञान महाविद्यालय शिवाजीनगर गढी येथील समाजशास्त्र विभागाच्या वतीने समकालीन भारतीय समाजातील प्रसार माध्यमांची भूमिका या विषयावर` एक दिवशीय चर्चासत्र दिनांक 23 मार्च 2024 रोजी घेण्यात आले या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे होते तर चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयातील उपप्राचार्य आणि इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर हे उपस्थित होते .त्यांनी आपल्या उद्बाटनपर भाषणात आजच्या काळातील प्रसार माध्यमाची समाजाच्या विकास आणि प्रगतीतील आवश्यकता प्रतिपादन केली. प्रसार माध्यमाच्या कार्यपद्धतीवरच आजच्या समाजाच्या विकासाची दिशा निश्चित होते. म्हणून प्रसार माध्यमांनी समाजातील वास्तव परिस्थितीचा सविस्तरपणे आढावा घेऊन माहिती प्रसिद्ध केली पाहिजे .अन्यथा समाजात प्रसार माध्यमाविषयी चुकीचा गैसमज होण्याची शक्यता असते .म्हणून आजच्या समाजाच्या दृष्टीने प्रसार माध्यमाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील समाजशास्त्र विभागातील डॉ. संग्राम गुंजाळ हे उपस्थित होते .त्यांनी समाजातील विविध प्रकारच्या प्रसार माध्यमाची कार्यपद्धती कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले .आजच्या काळातील समाजातील प्रसार माध्यमाची भूमिका हीच समाजाच्या विकासाची दिशा आणि तशा निश्चित करते असे सांगितले आधुनिक काळात तर प्रसार माध्यमाची कार्यक्षेत्र विस्तारित झालेले असून विविध प्रकारच्या प्रसार माध्यमातून समाजातील वास्तव जीवनाचा ,विविध समस्यांचा आढावा घेऊन त्याची मांडणी आणि आवश्यक असणारी कार्यपद्धती सुचविले जाते. प्रसार माध्यमे समाजाचा आरसा मानला जातो. म्हणजेच समाज जीवनाचे प्रतिबिंब प्रसार माध्यमात उमटणे गरजेचे आहे .अशाप्रकारचे विचार मांडले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाँडिचेरी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागातील डॉ.विशाल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले .त्यांनी समाज जीवनातील प्रसार माध्यमांची आवश्यकता किती आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रसार माध्यमावरच आधुनिक समाजाच्या विकासाची गती निर्धारित होते .म्हणून प्रसारमाध्यमनी आपली कार्यपद्धती योग्य पद्धतीने राबविली पाहिजे अन्यथा समाजाच्या विकासात अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रसार माध्यमे आणि समाज यांचा संबंध घनिष्ठ आहे. प्रसार माध्यमांनी समाजाचा सविस्तरपणे अभ्यास करून समाजालाआवश्यक असणाऱ्या घटकाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमावरच समाजाचे जीवन निर्धारित होते म्हणून प्रसार माध्यमे हे अलीकडच्या काळात समाज जीवनाचा महत्त्वाचा आधार ठरताना दिसतो. असे प्रतिपादन केले
तसेच अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  सदाशिव सरकटे यांनी आधुनिक काळातील प्रसार माध्यमे कशा प्रकारची भूमिका बजावतात आणि व्यक्ती आणि समाजाच्या दृष्टीने त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले समकालीन भारतीय समाजातील प्रसार माध्यमाची भूमिका प्रसार माध्यमाची भूमिका  या विषयावर वरील सर्व वक्त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील प्रा.रमेश रिंगणे यांनी केले तर प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ रामदास खताळ यांनी केले कार्यक्रमाचे आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.शिवाजी काकडे यांनी मानले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्याबरोबरच इतर महाविद्यालयातील प्राध्यापकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!