ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

कामचुकारांना अद्दल घडवायलाच हवी !

कामचुकारांना अद्दल घडवायलाच हवी !

विद्यार्थ्यांनी एका शिक्षकाला चपलांनी चोप  देत वर्गातून हाकलून लावल्याची घटना छत्तीसगढ मधील बस्तर या ठिकाणी एक शाळेत घडली. सदर घटनेचा व्हिडीओ सध्या सामाजिक माध्यमांतून प्रचंड व्हायरल होत आहे. हा शिक्षक प्रतिदिन दारू पिऊन यायचा आणि वर्गात झोपायचा. घटनेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षकाला तास घेण्यास सांगितले तेव्हा शिक्षकाने विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या देण्यास सुरुवात केली. तेव्हा वर्गातील समस्त विद्यार्थ्यांनी मिळून त्या शिक्षकाला चपलांनी चोप दिला. शाळेसारख्या पवित्र जागी जिथे विद्यादानाचे कार्य चालते, जिथे शालेय अभ्यासक्रमासह मुलांना नैतिकतेचे धडे जातात. देशाचा आदर्श भावी नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांवर संस्कारांची पाखरण केली जाते अशा पवित्र जागेवर दारू पिऊन येणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या देणाऱ्या शिक्षकाच्या बाबतीत जे झाले ते योग्यच झाले, अशी प्रतिकिया समाजातून व्यक्त केली जात आहे. शिक्षक प्रतिदिन शाळेत दारु पिऊन येत असताना शाळा प्रशासन झोपा काढत होते का ? असा संतप्त सवालही सामाजिक माध्यमांतून विचारला जात आहे त्यामुळे शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या शाळा प्रशासनावरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. विद्यादानासारखे पवित्र कार्य करण्याचे दायित्व असणाऱ्या शिक्षकाने शाळेत दारू पिऊन झोपा काढणे ही पराकोटीची कामचुकारता तर आहेच शिवाय माझे कोणी वाकडे करू शकणार नाही हा माजही त्यामध्ये दडलेला आहे. हा माज उतरवणारे विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहेत. आपल्याला नेमून दिलेल्या कामाच्या मोबदल्यात आपल्याला मासिक वेतन मिळत असते. त्यामुळे आपल्याला नेमून दिलेल्या कामाशी प्रामाणिक राहून, आपल्या कौशल्याचा वापर करून नागरिकांना सेवा देणे हे सेवा उपक्रमार्शीl निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांचे कर्तव्यच आहे. आपले कर्तव्य सोडून कामाच्या वेळेत आपले वैयक्तिक काम करत राहणे, कामाच्या वेळेत जागेवर उपस्थित ना राहणे, सहकर्मचाऱ्यांशी गप्पा मारण्यात वेळ वाया घालवणे, नागरिकांना ताटकळत ठेवणे, वेळेत काम करण्याचा मोबदल्यात लाच मागणे, लाच ना देणाऱ्याला कार्यालयात पुन्हा पुन्हा चकरा मारावयास लावणे यांसारखे प्रकार सरकारी कार्यालये, पोलीस स्थानके, रुग्णालये, बँका यांसारख्या ठिकाणी सर्रास घडताना दिसतात. वाद टाळण्याच्या दृष्टीने आणि आपल्या कामात आडकाठी नको म्हणून बऱ्याचदा आपण या कामचुकारांना विरोध करणे टाळतो. परिणामी यांना कामात टाळाटाळ करण्याची सवय लागून एक प्रकारचा माज चढतो. हा माज कसा उतरायचा याचा धडा छत्तीसगढ मधील विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे. हे विद्यार्थी सदर शिक्षकाला प्रतिदिन सहन करत होते अखेर सहनशक्ती मर्यादेपलीकडे गेल्याने त्यांनी पुढचे पाऊल उचलले. सरकारी कार्यालयातील कामचुकारांना जनता एका मर्यादेपलीकडे सहन करेल, वरिष्ठांकडे तक्रार करेल आणि त्यातूनही काही सुधारणा न झाल्यास येणाऱ्या काळात बस्तर येथील विद्यार्थ्यांप्रमाणे पुढचे पाऊल उचलेल हे सेवा उपक्रमाशी निगडित विभागात कार्य करणाऱ्या कामचुकार आणि मुजोर  कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावे

error: Content is protected !!