ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

खासदार गिरीश बापट यांचं निधन, जगदीश मुळीक यांनी दिली माहिती

 

पुणे | भाजपा खासदारआणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. गिरीश बापट यांचे पार्थिव आज (शनिवार) पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असल्याची माहिती त्यांच्या परिवाराकडून देण्यात आली आहे. तसेच आज संध्याकाळी सात वाजता वैंकुठ स्मशानभुमीत गिरीश बापट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. गिरीश बापट यांच्या जाण्याने पुण्यात भाजपाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसारमाध्यमांना गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आज दुख:द घटना घडली आहे. भाजपचे लोकप्रिय खासदार गिरीश बापट आज आपल्यात राहिले नाहीत. त्यांचे काहीवेळापूर्वीच निधन झाले. गेले एक दीड वर्षे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी हा धक्का असल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याची माहिती आज सकाळी समोर आली होती. बापट यांच्यावर सध्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU Ward) उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्यामुले त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून भाजच्या गोटात हालचालींना वेग आला होता. अखेर आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली त्यांच्या निधनानारे पुण्यात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!