ब्रेकिंग न्युज
आ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौराप्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहनपंकजाताई मुंडे यांची नाळवंडीत भर पावसात झाली वादळी सभागाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळेहे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोलदहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखीपोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!

प्रभाकर महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त गुळवंची येथे 24 ते 27 फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी- संतोष विभूते

सोलापूर बार्शी रस्त्यावरील गुळवंची येथील सदगुरूनाथ श्री प्रभाकर महाराज मंदिरात प्रभाकर महाराज यांच्या 67 व्या पुण्यतिथी निमित्त शनिवार दि. 24 ते मंगळवार दि.27 फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष भारत तांबे यांनी दिली .

सद्गुरू प्रभाकर महाराज यांच्या 67 व्या पुण्यतिथी ‎महोत्सवानिमित्त दिनांक 24 ते 27 फेब्रुवारीपर्यंत दररोज महापूजा, आरती,प्रसाद आदी कार्यक्रम होतील. शनिवारी (दि.24 )फेब्रुवारी रोजी सांयकाळी 8 वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर आरती करून महाप्रसाद वाटप होईल.
रविवारी (दि. 25) रात्री 10.45 वाजता‎ गुलालाचा कार्यक्रम होणार आहे. .25 ते 26 फेब्रुवारी पर्यंत दररोज महापुजा,आरती व महाप्रसाद केला जाणार आहे. उत्सवाची सांगता 27 फेब्रुवारी रोजी गाव प्रदक्षिणा करून होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुळवंची येथील सदगुरु श्री प्रभाकर मंदिर समितीने केले आहे.

error: Content is protected !!