ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

जलतरण तलावा नंतर  काही दिवसात सुसज्ज नाट्यगृह गेवराईकरांच्या सेवेत  – आ.लक्ष्मण पवार

जलतरण तलावा नंतर  काही दिवसात सुसज्ज नाट्यगृह गेवराईकरांच्या सेवेत  – आ.लक्ष्मण पवार
आ.लक्ष्मण पवारांच्या हस्ते गेवराई नगरपरिषदेच्या जलतरण तलावाचे लोकार्पण संपन्न
जलतरण तलावाचा लाभ घेऊ इच्छुकांनी न.प. मध्ये आपली नोंदणी करून घ्यावी- मुख्याधिकारी मांडुरके
गेवराई प्रतिनिधी;- आधी गेवराई शहरातील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या, आता सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आता आज पासून हा जलतरण तलाव शहरवाशीयांसाठी खुला करत आहोत. याबाबत विशेष काळजी घेऊन ती सुरळीत चालवण्यासाठी आपण न.प.च्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे आ.लक्ष्मण पवार यांनी सांगितले.
आज गेवराई शहरातील जलतरण तलावाच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
न.प.मुख्याधिकारी विक्रम मांडूरखे, सुशील जवंजाळ, ऍड.भगवान घुंबार्डे, जे.डी. शहा, सरपंच बोबडे, शाम कुंड,राहुल खंडागळे, दादासाहेब गिरी,भारत गायकवाड, ब्रम्हदेव धुरंधरे,जेष्ठ पत्रकार उत्तम हजारे, महेश आहेर, याहीया खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, गेवराई न.प.च्या माध्यमातून आजपर्यंत आपण शहरात ज्या वास्तू उभारल्या आहेत, त्या लोकांच्या उपयोगी पडतील आशा गरजा आधी पूर्ण केल्या आता येणाऱ्या काळात शहरवशीयांसाठी विविध सुख सुविधा उपलब्ध करून देता त्या सुरळीत चालवल्या गेल्या पाहिजेत यासाठी नियोजन करण्यात येईल.
तसेच शहरात उभारलेले सुसज्ज नाट्यगृह लवकरच गेवराईकरांच्या सेवेत सुरू करण्यात येईल  ते ही खुले करण्यात येणार आसल्याचे आ.लक्ष्मण पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान यावेळी आ.पवार यांच्या हस्ते बटन दाबुन जलतरण तलावात पाणी सोडून लोकार्पण करण्यात आले
   यावेळी बोलतांना मुख्याधिकारी विक्रम मांडुरके  म्हणाले की महाराष्ट्रातील अनेक शहरात रस्ता, नाली,पाणी, यामध्येच दिसले पण गेवराईत आल्या नंतर  आ.लक्ष्मण पवार यांच्या माध्यमातून  मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतोय  तर आ.पवारांच्या प्रयत्नातून वैशिष्टय़पूर्ण योजनेंतर्गत शहरात जलतरण तलाव सुरू करण्यात आला तरी नागरिकांनी आप आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे
    यावेळी  विठ्ठल मोटे, संजय इगळे,  वैभव पाटील, किशोर धोडलकर, बद्दोदिन, आप्पासाहेब  कानगुडे, राम पवार,राजाभाऊ आर्दड,सतिष दाभाडे, छगन आप्पा हादगुले, बाबा खरात, करण सुतार,मुन्नाभाई,लक्ष्मण चव्हाण, शेख निजाम, समाधान  मस्के, अमोल मस्के, पिटु साळवे.दिलीप सोनवणे, व,शेख बाबा, मतिन कुरेशी, रावसाहेब काळे,श्रीहरी गंगाधर, महेश चेके,रजित खाजेकर,उध्दव मडके, सय्यद  हासन,  आदींसह शहरातील  प्रतिष्ठित नागरिक व न.प.कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राघव वाव्हळे यानी केले आभार  भरत गायकवाड यांनी मानले,
error: Content is protected !!