ब्रेकिंग न्युज
देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान १७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरीगेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकीगेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुचतहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नगेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटलाडॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कारपैठण – रामपुरी बस तलवाडा बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांचे हाल…जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले

देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आज करण्यात आली घोषणा. तब्बल 97 कोटी मतदार या देशातील केंद्र सरकार ठरवणार .

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आज करण्यात आली घोषणा. तब्बल 97 कोटी मतदार या देशातील केंद्र सरकार ठरवणार 

नवी दिल्ली : देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आज घोषणा करण्यात आली. तब्बल 97 कोटी मतदार या देशातील केंद्र सरकार ठरवतील. पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ देखील संपुष्टात येणार आहे. 24 जून रोजी मुदत संपत आहे. जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजीव कुमार पुढे म्हणाले की, “आमच्याकडे 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत, जे काही खंडांच्या एकत्रित मतदारांपेक्षा जास्त आहेत. 10.5 लाख मतदान केंद्रे, 1.5 कोटी मतदान अधिकारी, सुरक्षा अधिकारी. 55 लाखांहून अधिक ईव्हीएम, 4 लाख वाहने असतील.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार
पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8)
तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11 )
चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ – 11 )
पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )
12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, पुरुष मतदारांपेक्षा महिला अधिक
देशभरातील मतदारांमध्ये लिंग गुणोत्तर 948 आहे आणि 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरात घरबसल्या मतदानाची सुविधा देण्यासाठी सज्ज
85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांसाठी आणि देशभरातील दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी केली आहे.

सर्व 10.48 लाख मतदान केंद्रांवर खात्रीशीर किमान सुविधा असणार
पिण्याचे पाणी
शौचालय
चिन्ह
रॅम्प/व्हीलचेअर
मदत कक्ष
मतदार सुविधा केंद्र
पुरेसा प्रकाश
शेड
मतदारसंघ मतदान कधी
नंदुरबार 13 मे
धुळे 20 मे
जळगाव 13 मे
रावेर 13 मे
बुलडाणा 26 एप्रिल
अकोला 26 एप्रिल
अमरावती 26 एप्रिल
वर्धा 26 एप्रिल
रामटेक 19 एप्रिल
नागपूर 19 एप्रिल
भंडारा-गोंदिया 19 एप्रिल
गडचिरोली-चिमूर 19 एप्रिल
चंद्रपूर 19 एप्रिल
यवतमाळ – वाशिम 26 एप्रिल
हिंगोली 26 एप्रिल
नांदेड 26 एप्रिल
परभणी 26 एप्रिल
जालना 13 मे
औरंगाबाद 13 मे
दिंडोरी 20 मे
नाशिक 20 मे
पालघर 20 मे
भिवंडी 20 मे
कल्याण 20 मे
ठाणे 20 मे
मुंबई-उत्तर 20 मे
मुंबई – उत्तर पश्चिम 20 मे
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) 20 मे
मुंबई उत्तर मध्य 20 मे
मुंबई दक्षिण मध्य 20 मे
दक्षिण मुंबई 20 मे
रायगड 7 मे
मावळ 13 मे
पुणे 13 मे
बारामती 7 मे
शिरुर 13 मे
अहमदनगर 13 मे
शिर्डी 13 मे
बीड 13 मे
उस्मानाबाद 7 मे
लातूर 7 मे
सोलापूर 7 मे
माढा 7 मे
सांगली 7 मे
सातारा 7 मे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग 7 मे
कोल्हापूर 7 मे
हातकणंगले 7 मे

error: Content is protected !!