ब्रेकिंग न्युज
देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान १७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरीगेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकीगेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुचतहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नगेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटलाडॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कारपैठण – रामपुरी बस तलवाडा बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांचे हाल…जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले

राजा शिवछत्रपती पारंपारिक शिवजन्मोत्सव अंबाजोगाई आयोजित ऐतिहासिक शोभायात्रेत शिवप्रेमींनी उपस्थित रहावे -अध्यक्ष संतोष काळे

राजा शिवछत्रपती पारंपारिक शिवजन्मोत्सव अंबाजोगाई आयोजित ऐतिहासिक शोभायात्रेत शिवप्रेमींनी उपस्थित रहावे -अध्यक्ष संतोष काळे
अंबाजोगाई प्रतिनिधी;-अंबाजोगाई शहरात राजा शिवछत्रपती पारंपरिक शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरी होणार असून या ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळ्यास अंबाजोगाई व परिसरातील शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन राजा शिवछत्रपती पारंपारिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संतोष काळे यांनी केले आहे
 अंबाजोगाई शहरात मागील 60 वर्षापासून राजा शिवछत्रपती पारंपारिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवजन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन तसेच शिवजन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य अशी ऐतिहासिक शोभायात्रा काढली जाते. घोडे हत्ती उंट वारकरी वासुदेव हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण असते तर या शोभायात्रेत दांडपट्टा, तलवारबाजी यांसारखे ऐतिहासिक शिवकालीन खेळ राजा शिवछत्रपती पारंपरिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शोभायात्रेत दाखवले जातात.
राजा शिवछत्रपती पारंपरिक शिवजयंती उत्सवानिमित्त गुरुवार दि. 28 मार्च 2024 रोजी सायं. 6.00 वा.ऐतिहासिक अशी भव्य दिव्य शोभा निघणार असून या शिवजन्मोत्सव शोभा यात्रेला उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  विजयसिंह (राजे) पंडित यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्षस्थानी नंदकिशोर मुंदडा राहणार असून अंबा साखर चे चेअरमन रमेशराव आडसकर, मा.नगराध्यक्ष  राजकिशोर मोदी,मा.आ.पृथ्वीराज साठे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,दीनदयाळ बँक अध्यक्ष मकरंद पत्की,मा उपनगराध्यक्ष बबन लोमटे,सारंग पुजारी,युवा नेते ऋषिकेश आडसकर,युवा नेते दीपक शिंदे,शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष  रणजीत लोमटे,मा नगरसेवक अनंत लोमटे, सुरेश कराड,दिलीप काळे,कमलाकर कोपले, संजय गंभीरे,प्रशांत आदनाक,बाळासाहेब सोनवणे,शिवसेना तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, रोटरी अध्यक्ष स्वप्निल परदेशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अंबाजोगाई शहरात राजा शिवछत्रपती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने निघणाऱ्या ऐतिहासिक शोभायात्रेस अंबाजोगाई तालुक्यातील शिवप्रेमीनी उपस्थित रहावे असे आवाहन राजा शिवछत्रपती पारंपारिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष काळे यांनी केले आहे.
error: Content is protected !!