ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

*इंडिया आघाडीच्या पारड्यात बीडचे एक मत टाकण्यासाठी प्रयत्नशील राहणार* – *खा रजनीताई पाटील* *काँग्रेसच्या बैठकीत बजरंग सोनवणेंना विजयी करण्याचा निर्धार* ———————————

 

बीड (केज) :- देशात सर्वधर्म समभाव हा भाव वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली त्यात काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे देशात सत्ता मिळवायची असेल तर एक एक खासदार महत्वाचा आहे म्हणून इंडिया आघाडीच्या पारड्यात बीडचे एक मत टाकण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील राहील अशी स्पष्ट ग्वाही काँग्रेसच्या नेत्या खा रजनीताई पाटील यांनी दिली लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आयोजित काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्या प्रसंगी दिली

 

 

रजनीताई पाटील यांच्या शिवनेरी या निवासस्थानी आयोजित या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे निरीक्षक जीवनराव गोरे, माजी मंत्री अशोकराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष.आणि इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, विधानसभा प्रमुख सुरेश तात्या पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, महिला आघाडीच्या पांडूळेताई आदित्य दादा पाटील, पशुपतीनाथ दांगट, डॉ. नरेंद्र काळे, माजी नगराध्यक्ष कबिरोद्दिन इनामदार, दलील इनामदार, श्रीधर बाबा भवर हे उपस्थित होते.

 

यावेळी रजनीताई पाटील पुढे बोलताना म्हणाल्या कि ; कार्यकर्त्यांनी एकदिलाने आणि एकविचाराने कमंक्रून बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे आवाहन केले. तसेच या देशात जर पुन्हा भाजपचे सरकार आले तर कदापि देशात निवडणूक होणार नाहीत. या देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होईल. याचा सर्वांनी विचार करून पुरोगामी विचाराच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी एकत्रितपणे व समन्वय ठेवून काम करण्याची आवाहनहि त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले

 

यावेळी जीवनराव गोरे यांनी देखील इंडिया आघाडीची मूठ आवळून जिल्ह्यातून बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी बूथ कमिट्याची रचना करून मतदारांना मतदान केंद्रा पर्यंत घेवून जात मतदान करून घेण्याचे नियोजन करण्याचा सल्ला दिला.

———————————–

चौकट :-

 

ताईंचे आशीर्वाद माझ्यासाठी विजय प्रशस्त करणारे

– बजरंग सोनवणे

 

रजनीताईंकडे पाच राज्यांची जबाबदारी आहे त्यातून त्यांनी वेळ काढला व येथे येऊन त्यांनी मला आशीर्वाद दिले ते माझ्यासाठी मोलाचे आहेत त्यांच्या साथीमुळे माझा विजयाचा मार्ग प्रशस्त झाला आहे .आता राजकीय विश्लेषकांसाठी कुठल्याही किंतु परंतु ला जागा नसल्याचे बजरंग सोनवणे यांनी नमूद करत ताईंचे आभार मानले तसेच भविष्यात योग्य समन्वय ठेऊनच काम करू व कुठलीही अडचण येणार नाही याची दक्षता घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले

 

————————————-

चौकट :-

 

नेत्यांनी जनतेचे मन ओळखण्यात शहाणपण

– अशोक पाटील

 

पूर्वी नेत्याच्या खिशात जनता असायची त्यामुळे नेते सांगतील तेच ते ऐकत असत पण आता या निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे आता लोकांचे म्हणणे समजून घेण्यात हुषारी असल्याचे मत माजी मंत्री अशोक पाटील यांनी यावेळी व्यक्त केले

 

————————————–

 

या बैठकीला जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

या बैठकीचे प्रास्ताविक राहुल सोनवणे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रवीण शेप यांनी केले

error: Content is protected !!