ब्रेकिंग न्युज
आम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे  डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचारपाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतबीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवलेमहायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या कार्यालयास भेट ..!सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबाआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदिप थोरवेपंकजाताईच राजकारण सर्व समावेशक ,त्या खासदार होण , बीड जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला करणजिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय ‘ मशिन अभावी तर स्वरातीचे सिटी स्कॅन ४ महिन्यांपासून बंद रूग्णांची हेळसांड  ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळेघुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवर

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासना विरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी संघर्ष करावा -डॉ.अनिल बोंडे.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासना विरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी संघर्ष करावा -डॉ.अनिल बोंडे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️लातुर | प्रतिनिधी.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार एवढी फसवणूक आज पर्यंत कोणीच केली नाही पिक विमा शेतकऱ्याच्या भल्याकरिता असला तरी या शासनाने विमा कंपन्यांना मालामाल करण्याचा उद्योग केला आहे पीक विम्याचे निकष बदलून शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक केली आहे त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार विरुद्ध सर्व पातळीवर संघर्ष करावा असे आव्हान भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.
लातूर जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहावर जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत बोलताना डॉ अनिल बोंडे यांनी राज्य सरकारने वेळोवेळी शेतकऱ्याची कशी फसवणूक केली याबाबत सविस्तर माहिती देऊन संघर्ष करण्याचे आवाहन केले
या बैठकीस औश्याचे आमदार अभिमन्यू पवार प्रदेश भाजपाचे प्रवक्ते गणेशदादा हाके माजी आमदार गोविंदांण्णा केंद्रे शिवाजीराव पाटील कव्हेकर विनायकराव पाटील शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मागे जिल्‍हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, त्र्यंबकबाबा गुट्टे अशोक केंद्रे रामचंद्र तिरूके, सभापती गोविंद चिलकुरे रोहिदास वाघमारे जयश्री पाटील स्वाती जाधव प्रेरणा होनराव यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे जिप व पंसचे सभापती, उपसभापती, सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक व इतर संस्थांचे लोकप्रतिनिधी पक्षाचे जिल्हा, मंडल पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!