ब्रेकिंग न्युज
लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी मतदारांची पाटोदा तालुक्यातील अंमळनेर , पिंपळवंडी , उंडेवाडी , साबळेवाडी, पांढरवाडी , गांधणवाडी, कोतन , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बालेकिल्ले – संतोष आप्पा पोकळेपंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदे

वारकरी संतांनी धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारनेला प्राधान्य दिले-ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे

वारकरी संतांनी धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारनेला प्राधान्य दिले-ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे
बीड प्रतिनिधी;- वारकरी संतांनी धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारनेला प्राधान्य दिले आणि म्हणूनच अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि विज्ञानाकडे, अंधकाराकडून प्रकाशाकडे, अधोगतिकडून प्रगतीकडे आणि असत्याकडून सत्याकडे घेऊन जाणाऱ्या वारकरी धर्माची भगवी पताका आजही डोलाने फडकत आहे असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे यांनी केले. गणेश नगर बीड येथे शिवजयंती व संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बीजे निमित्ताने आयोजित कीर्तन महोत्सवातील चौथे कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते. धर्माचे पालन। करणे पाखंड खंडन।। हेचि आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम।। या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील अभंगावर चिंतन करताना ते म्हणाले कि वारकरी संतांनी धर्मचिकित्सा आणि धर्म शुद्धीकरणाला प्राधान्य दिले. धर्माच्या नावाखाली चालणारा खोटेपणा, लबाडी, दांभिकपणा, भोंदूगिरी, भाकडकथा, चमत्कार, अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, विधी-निषेध, शुभ-अशुभ, नवस-सायास, उपास-तापास (एकादशी सोडता) भेदाभेद, खुळचट कल्पना, अनिष्ठ रूढी, प्रथापरंपरा, चालीरीती या धर्मातील पाखंडाचे जोरदार खंडन वारकरी संतांनी केले, आणि त्यासाठी प्रसंगी कोणाचीही भीड न बाळगता शब्दरूपी तीक्ष्ण शस्त्रे हाती घेऊन या पाखंडांवर प्रखर हल्ले चढवले. धर्म लोकांसाठी असतो लोकं धर्मासाठी नसतात. त्यामुळे धर्माच्या आडून होणारं शोषण, मिळवणूक, लुबाडणूक करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधातील बंड म्हणजे वारकरी धर्म. प्रगत व विज्ञानवादी विचारांच्या व तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून प्रगत समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वारकरी संतांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. न्याय समता स्वातंत्र्य, बंधुता, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता ही मूल्य वारकरी संतांनी समाजात रुजवली आणि याच मूल्यांवर आधारित अठरापगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण करण्याचे महान कार्य छत्रपती शिवरायांनी केले हे वारकरी संतांच्या शिकवणुकीचे फलित होते असं ते पुढे बोलताना म्हणाले. याप्रसंगी पत्रकार अनंत घिगे साहेब, ह.भ.प. भीमराव म. यादव, मनोज म. बोटे, वाल्मीक म. चाटे, किसन म. माने, वैभव म. येडे, शंभू म. धांडे, चंद्रकांत म. शेळके भीमाशंकर म. खटाने यांच्यासह गायक, वादक, टाळकरी व भावी भक्त उपस्थित होते.
error: Content is protected !!