ब्रेकिंग न्युज
आम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे  डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचारपाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतबीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवलेमहायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या कार्यालयास भेट ..!सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबाआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदिप थोरवेपंकजाताईच राजकारण सर्व समावेशक ,त्या खासदार होण , बीड जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला करणजिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय ‘ मशिन अभावी तर स्वरातीचे सिटी स्कॅन ४ महिन्यांपासून बंद रूग्णांची हेळसांड  ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळेघुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवर

बीड जिल्ह्यातील बाराखांबी मंदिर परिसरात पुरातत्व खात्याने शोध मोहिम केली सुरू

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

बीड जिल्ह्यातील बाराखांबी मंदिर परिसरात पुरातत्व खात्याने शोध मोहिम केली सुरू

बीड (प्रतिनिधी):- मराठवाड्यातील बीड येथील अंबाजोगाई येथे करण्यात आलेल्या उत्खननात अनेक पुरातन वस्तु आणि रचना सापडल्या आहेत. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबी का मकबरा परिसरातही उत्खनन करण्यात आले होते. तिथे उत्खननात जुने अवशेष सापडले होते. मराठवाड्यात पुरातत्व विभागाचे अधिकारी आता तळ ठोकून बसले आहेत.

दख्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा ‘बीबी का मकबरा’ परिसरात गेल्या महिन्याभरापासून उत्खनन सुरू आहे. त्यावेळी उत्खननात अनेक पुरातन वस्तु, रचना व अवशेष सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर परिसरात सापडलेल्या या अवशेषांमुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत असताना आता बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथेही पुरातन वास्तु सापडल्या आहेत. आंबेजोगाई येथील सकलेश्वर मंदिर (बाराखांबी) परिसरात 15 मार्चपासून उत्खनन सुरू करण्यात आले आहे. जवळपास 50 जणांचे पथ सकलेश्वर मंदिर परिसरात तळ ठोकून बसले आहेत.

सकलेश्वर मंदिर येथे उत्खननाचे काम सुरू असताना 10 दिवसांतच दोन मंदिरांचा पाया आढळून आला आहे. यापूर्वी 2018मध्ये उत्खनन करण्यात आले होते. तेव्हादेखील तीन पुरातन मंदिरांचे अवशेष आढळून आले होते. आता पुन्हा एकदा दोन मंदिराचे अवशेष आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकलेश्वर मंदिराचे निर्माण 1228 इसवी सनात यादव राजवंशांनी बांधले आहे. एका शिलालेखानुसार, ते देवगिरी किल्ल्याचे शासक होते. सकलेश्वर मंदिराला बाराखंबी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. सकलेश्वर मंदिर परिसरात 15 मार्चपासून खोदकाम करण्यात सुरुवात झाली आहे. प्रत्येकी 100 वर्गफुट परिसरात शोधकाम करण्यात आले होते.

पुरातत्व विभागाला या परिसरात दोन मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. त्यातील एकाचे नाव खोलेश्वर असून ते यादव जनरल यांच्या नावाने ठेवण्यात आले आहे. तर, खोदकामादरम्यान काही प्राचीन वीटादेखील सापडल्या आहेत. जे मंदिराच्या कळसाचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यातबरोबर, हात व पायांच्या आकाराचे मूर्तीकलादेखील खोदकामात समोर आल्या आहेत.

दरम्यान,अंबाजोगाई शहराला प्राचीन काळात अमरापुर, जयंतीपुर, जोगायम्बे नावाने ओळखले जायचे. तसंच, हैदराबादच्या निजामच्या काळात मोमिनाबाद नावानेही ओळखले जायचे. या शहरात हत्तीखाना, दासोपंत मंदिर, योगेश्वरी मंदिरासारखी स्मारकदेखील आहेत.

error: Content is protected !!