गेवराई तालुक्यात कोरोनाचा उद्रेक
कोल्हेर येथील महानुभव आश्रमात २९ पॉझीटीव्ह
गेवराई (प्रतिनिधी) तालुक्यातील कोल्हेर या ठिकाणी असना-या येवले वस्तीवरिल महानुभव आश्रमात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 60 जणांच्या एंटीजन टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी 29 रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह आले असल्याची माहीती तहसिलदार सचिन खाडे यांनी दिली
या ठिकाणी वास्तवात असणा-या ६० जनांची एन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. यापैकी तब्बल २९ जन कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. तसेच सदर ठिकाणी गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे व तालुका वैधकीय अधीकारी यांनी भेट दिली असुन याठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला होता .याठिकाणी अनेकांनी हजेरी लावली होती पॉझीटिव्ह रूग्णाना विलीगीकरण कक्षात हलवण्यात आले असुन प्रशासनाला देखील यामुळे हादरा बसला आहे. याठिकाणी जे लोक आले होते त्यांनी स्वत: पुढे येऊन कोरोना चाचणी करूण घ्यावी असे अवाहन गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी केले आहे .तर सदर चा परिसर कँटोन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.