ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

डॉ. एकनाथ शिंदेंनी ऑपरेशनबद्दल सांगू नये, आम्हाला मुका मार देता येतो

 

पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंती एकनाथ शिंदे यांना टोला लागलेला आहे. – डॉक्टरांना प्रश्न विचारा, वीर सावरकर कोणत्या बोटीतून उडी मारून कोणत्या बंदरावर गेले? हे आता फोन करून विचारा, ऑपरेशनबद्दल आम्हाला सांगू नका, आम्हाला मुका मार देता येतो. तुम्ही ऑपरेशन करत राहा, तुम्हाला मुका मार बसल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला आहे.

राऊत म्हणाले की, डॉक्टरकी महाराष्ट्रात पायलीला ५० मिळत असतात. प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळतेय हा देशाचा अनुभव आहे. अशाप्रकारे डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठाची चौकशी व्हायला पाहिजे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्यांना डॉक्टरकी कशी देता? तुमच्या कोणत्या फाईली अडकल्या आहेत म्हणून हे करावे लागते. गेल्या काही वर्षात हा प्रकार वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत:वरच एक शस्त्रक्रिया करायला हवी. सामान्य जनतेने मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला बहुतेक या महान कार्याबद्दलच त्यांना डॉक्टरेट मिळाली असावी.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर सरकार कोसळेल असं विधान केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जयंत पाटील बोलले ते खरे आहे. जर कायद्याने सर्वकाही होणार असेल तर मुख्यमंत्र्यांसह १६ आमदार अपात्र ठरेल आणि सरकार कोसळेल असं त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!