ब्रेकिंग न्युज
आ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौराप्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहनपंकजाताई मुंडे यांची नाळवंडीत भर पावसात झाली वादळी सभागाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळेहे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोलदहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखीपोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांकडून आशा सेविकांचा आंदोलनांवर उपस्थित केला प्रश्न

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांकडून आशा सेविकांचा आंदोलनांवर उपस्थित केला प्रश्न

मुंबई(प्रतिनिधी) :- राज्याच्या आज पहिल्या दिवशी विरोधी पक्षांकडून आशा सेविकांचा मुद्दा उचलण्यात आला. आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांंनी सरकारला घेरले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आशा सेविकांच्या आंदोलनावरुन सरकारला धारेवर धरत सरकारला आशा सेविकांची कदर नाही, असा हल्ला बोल करत आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.

मुंबईतील आझाद मैदान येथे आशा सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. वाढीव वेतनासह अन्य मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका आशा सेविकांनी घेतली आहे. यावर सरकारने आशा सेविकांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये केली.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबई येथे सुरू झाले. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्च पर्यंत चालू राहणार आहे. आज पहिल्या दिवशी विरोधी पक्षांकडून आशा सेविकांचा मुद्दा उचलण्यात आला.

error: Content is protected !!