ब्रेकिंग न्युज
या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागरसंत तुकाराम मंदिर तळेगाव येथे निवासी संस्कार शिबिराचे आयोजनलिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीपंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडा डोअर टू डोअर मतदारांपर्यंतमादळमोही कोळगाव सर्कलमध्ये बजरंग सोनवणे यांच्या दौर्‍यामुळे मतदारांमध्ये उत्साहपंकजाताईंच्या विजयासाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांचा विजय संकल्प मेळावातहसीलदार खोमणे साहेब थोडी जनाची नाही तर मनाची तरी राखा व निराधारांची हेडसान थांबवा – राधाकिसन मोटेशारदा कबड्डी अकॅडमीच्या वतीने गेवराईत उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबिर-रणवीर पंडित

मनसेचे अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी; ठाणे पोलिसांनी बजावली नोटीस

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम आणि सांगली येथील दर्याच्या विशयानानंतर करण्यात आलेल्या कारवाईनंतर याचे लोन संपूर्ण महाराष्ट्रात पसरले असून मनसे जिल्ह्ध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुब्रायतील अनधिकृत आणि वन खात्याच्या जानिनिव्हर असलेल्या मशिदीवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला पत्र लिहिले होते याच पार्श्वभूमीवर विनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी लागू करणारे आदेश पोलिसांनी जारी केले.

मुंब्रादेवी डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि मजार पुढील १५ दिवसांत हटवली नाही तर त्याच जागेवर मंदिर बांधू, असा इशारा मनसेने दिला होता. त्यामुळे ठाणे पोलिसांनी जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी लागू करताना त्या परिसरात १४४ कलम लागू केले.मुंब्रा परिसरात रमजानच्या महिन्यांमध्ये मनसेच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून मुंब्रा पोलिस ठाण्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात जमाव जमत होता.

रमजानचा महिना सुरू असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस आणि प्रशासन यांनी खबरदारी घेत जाधव यांना मुंब्रा भागात प्रवेशबंदीची नोटीस बजावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दादर शिवाजी पार्क येथील मेळाव्यात माहीम येथील खाडीतील बेकायदा दर्ग्याबाबत आवाज उठवला. तेथील बेकायदा बांधकामांची छायाचित्रे जाहीर केली. त्यानंतर पालिका व पोलिसांनी बेकायदा बांधकाम पाडले. त्याचवेळी मुंब्र्यातील अनधिकृत मशीद व मजार याच्यावर कारवाईचा इशारा ठाण्यातील मनसेने दिला होता.

error: Content is protected !!