ब्रेकिंग न्युज
पोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!शिक्षण विभागाला बदनाम करणाऱ्या विजय जाधव यांचा शिक्षक संघटनांकडून जाहीर निषेधवारकरी संत विचार महापरिषद महाराष्ट्र बहुउद्देशीय संघटनेची स्थापनापत्रकारांचा तोतया पत्रकार संभावना करणाऱ्या विजय जाधव या शिक्षकाचा जामखेड तालुका पत्रकारांकडून जाहीर निषेध, गुन्हा नोंद करण्याची मागणी !तरूण पिढीने मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवेचौंडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

यंदा दहावी बोर्डाचे पेपर हे दोन सत्रात ; सकाळी 11 वाजता आणि दुपारी 3 वाजता पेपर होणार

धनंजय कुलकर्णी -उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

यंदा दहावी बोर्डाचे पेपर हे दोन सत्रात ; सकाळी 11 वाजता आणि दुपारी 3 वाजता पेपर होणार

SSC Exam : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा आकडा हा 32 हजार 189 ने वाढलाय. 1 मार्च ते 26 मार्चपर्यंत दहावीची परीक्षा असणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेत 10 मिनिटं वाढवून मिळणार आहेत. त्याशिवाय विशेष म्हणजे यंदा राज्यभरातून पहिल्यांदाच 56 तृतीयपंथी परीक्षा देणार आहेत.

यंदा दहावी बोर्डाचे पेपर हे दोन सत्रात होणार असून सकाळी 11 वाजता आणि दुपारी 3 वाजता पेपर होणार आहेत.

मुलांना हे नियम लक्षात ठेवा!
परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर जाणं बंधनकारक आहे.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी 10 मिनिटं विद्यार्थ्यांना जास्तीचे मिळणार आहेत.
गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात होणार आहे.
कॉपी प्रकरणे थांबविण्यासाठी केंद्रावर बैठे पथक असणार आहे.
राज्य मंडळाची आणि जिल्हा प्रशासनाची मिळून सुमारे 400 पथक नियुक्त करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाने विभागनिहाय हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी 020 – 27705271, 020-25505272 या फोन नंबर देण्यात आले आहेत.

 

 

error: Content is protected !!