ब्रेकिंग न्युज
आ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौराप्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहनपंकजाताई मुंडे यांची नाळवंडीत भर पावसात झाली वादळी सभागाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळेहे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोलदहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखीपोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!

एच सी सी इंग्लिश मीडियम स्कूल नान्नज येथे जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

सोलापूर संपादक- महेश पवार

प्रतिनिधी- संतोष विभूते

एच सी सी इंग्लिश मीडियम स्कूल नान्नज येथे जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून दी मेरी बी हार्डिंग अध्यापक विद्यालय सोलापूरच्या प्राचार्या रुपश्री येवलेकर या होत्या. त्यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव गीत , लोकनृत्य तसेच लेझीम आणि झाज पथकाने बहारदार प्रदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे कार्यवाहक विश्वास भास्कर प्रशालेच्या समन्वयक कु स्नेहल मासिह , नागमनी पडलेकर हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी ची विद्यार्थिनी कु श्रावणी पाटील हिने केले तर इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी कु संस्कृती पाटील हिने आपले मनोगत व्यक्त केले . विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वास भास्कर सर तसेच सर्व शिक्षक वृंद विशेषतः यल्लो हाऊस च्या शिक्षकानी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .आभारप्रदर्शन सहशिक्षिका उषा लोंढे यांनी केले.

error: Content is protected !!