ब्रेकिंग न्युज
पोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!शिक्षण विभागाला बदनाम करणाऱ्या विजय जाधव यांचा शिक्षक संघटनांकडून जाहीर निषेधवारकरी संत विचार महापरिषद महाराष्ट्र बहुउद्देशीय संघटनेची स्थापनापत्रकारांचा तोतया पत्रकार संभावना करणाऱ्या विजय जाधव या शिक्षकाचा जामखेड तालुका पत्रकारांकडून जाहीर निषेध, गुन्हा नोंद करण्याची मागणी !तरूण पिढीने मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवेचौंडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

*मराठवाडा साहित्य परिषद, केज शाखेच्या* *अध्यक्षपदी राहुल गदळे तर कार्याध्यक्ष पदी प्रा डॉ नवनाथ काशीद*

केज! प्रतिनिधि!

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठवाडा साहित्य परिषद शाखा केज ची बैठक हनुमंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष ईश्वर मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पुढील वर्षासाठी सर्वसंमतीने अध्यक्ष म्हणून राहुल सखाहरी गदळे यांची तर कार्याध्यक्षपदी बाबुराव आडसकर महाविद्याल्या चे प्राध्यापक डॉ नवनाथ काशीद यांची निवड करण्यात आली.
केज शहरात गेली बारा वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्य सुरु आहे. केज शहर व तालुक्यात साहित्यिक चळवळ रुजवण्यासाठी या परिषदेने मोठे कार्य केले आहे. आतापर्यंत तालुका व जिल्हापातळीवरील अनेक साहित्य संमेलने केज मसाप ने घेतली आहेत. मध्यंतरी गेली दोन वर्षांपासून कोरोना प्रतिबंधामुळे परिषदेचे काम मंदावले होते.
27 फेब्रुवारी रोजी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या स्मृतीत साजरा केल्या जाणाऱ्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून येथील सार्वजनिक वाचनालयात शाखेचे अध्यक्ष हनुमंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची बैठक पार पडली. यावेळी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीस सुरुवात झाली. प्रास्ताविक हनुमंत भोसले यांनी केले तर संस्थापक अध्यक्ष ईश्वर मुंडे, हनुमंत घाडगे व जनार्धन सोनवणे,कु स्नेहा गुंड यांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवण्याची गरज व महत्व विशद केले. त्यानंतर सर्वच उपस्थित सदस्यांनी राजभाषा मराठी वर आपले विचार व्यक्त केले.
बैठकीच्या दुसऱ्या सत्रात केज मसाप. ची पुढील वर्षाची कार्यकारिणी निवडण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली. पुढील एक वर्षांसाठी सर्वसंमतीने राहुल सखाहरी गदळे यांची अध्यक्षपदी तर प्राध्यापक डॉ. नवनाथ काशीद यांची कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. पुढील काळात केज मसाप. चे कार्य गतिमान करण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यासह सर्वच सदस्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्रूबा सोनवणे यांनी केले तर आभार कु स्नेहा गुंड हिने व्यक्त केले. या बैठकीला शेख अजिमोद्दीन, श्रीमती सीमा गुंड, प्रा डॉ बाबासाहेब हिरवे, महेश जाजू, बाबासाहेब केदार, एम डी घुले, मधुकर सिरसट, विश्वम्बर गणाचारी सह इतर सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!