ब्रेकिंग न्युज
पोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!शिक्षण विभागाला बदनाम करणाऱ्या विजय जाधव यांचा शिक्षक संघटनांकडून जाहीर निषेधवारकरी संत विचार महापरिषद महाराष्ट्र बहुउद्देशीय संघटनेची स्थापनापत्रकारांचा तोतया पत्रकार संभावना करणाऱ्या विजय जाधव या शिक्षकाचा जामखेड तालुका पत्रकारांकडून जाहीर निषेध, गुन्हा नोंद करण्याची मागणी !तरूण पिढीने मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवेचौंडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सत्यमेव जयते फार्मर कप 2023 मार्डी येथील शेतकरी गटाला मिळाले एक लाखाचे बक्षीस

सोलापूर संपादक- महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

मार्डी येथील सूर्यपूत्र शेतकरी गटाला एक लाख रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह

 

सिनेअभिनेते अमीर खान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप 2023 या स्पर्धेत मार्डी येथील सूर्यपूत्र शेतकरी गटाला एक लाख रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात मार्डी येथील शेतकरी गटाला गौरविण्यात आले. राज्यातील 39 तालुक्यातून तीन हजार शेतकरी गट या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातून 21 गटांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सिनेअभिनेते अमीर खान, किरण राव यांच्या हस्ते सूर्यपूत्र शेतकरी गटाला बक्षीस देण्यात आले. यावेळी अभिनेते,जॉकी श्राप, सोनाली कुलकर्णी,पुष्कर शोत्री, स्पृहा जोशी,प्रकाश राज,सहयाद्री ऍग्रो प्रोड्युसर कंपनी चे डायरेक्टर विलास शिंदे ,अविनाश पोळ,सत्यजित भटकळ , सत्यवान देशमुख,अतिष शिरगिरे, तपस्वी जीवने,सूर्यपूत्र शेतकरी गटाच्या मार्गदर्शक सुवर्णा झाडे, गटातील शेतकरी व्यंकटेश पाटील, मनोरंजन जाधव, संतोष तोडकर, अपर्णा देशमुख,रामचंद्र ढगे, हनुमंत काटे,मीनाक्षी भाकरे, नितीन गवळी, गणेश पाटील, मीरा माळी,जनाबाई इनामदार, करुणा माळी यावेळी उपस्थित होते.
सूर्यपूत्र शेतकरी गटाच्या मार्गदर्शक, राष्ट्रवादी महिला काँग्रेस (अजित पवार गट)च्या प्रदेश सरचिटणीस सुवर्णा झाडे यांनी मार्डी गावातील 13 शेतक-यांना एकत्रित केले. सेंद्रिय पद्धतीने सोयाबीन उत्पादन करण्याचे नियोजन केले. गटातील प्रत्येक सदस्याने प्रत्येकाच्या शेतात जाऊन योगदान दिले. गोमूत्र, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क अशा सेंद्रिय निविष्ठांचा वापर करुन सोयाबीनचे उत्पादन घेतले. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना झाडे म्हणाल्या, मला शेतीची आवड नसताना देखील गावातील शेतक-यांनी मला सामावून घेतले. लोकांचे टोमणे सहन केले. पण जिद्द सोडली नाही.सेंद्रिय शेतीची फिल्म दाखवून तर कधी कृषी अधिकारी व पाणी फाउंडेशन टीम चे मार्गदर्शन तर कधी ऑनलाइन शेती शाळा यामध्ये भाग घेऊन या उपक्रमात यश मिळविले. बियाणे, सेंद्रिय निविष्ठा एकत्रित खरेदी केल्यामुळे शेतक-यांचा फायदा झाला. राजकारण बाजूला ठेवून केवळ शेतक-यांचे हित, त्यांची प्रगती हेच ध्येय समोर ठेवल्यामुळेच हे यश मिळाले. एक लाख रुपयांचे बक्षीस सिनेअभिनेते अमीर खान यांच्या हस्ते मिळाले.

error: Content is protected !!